“देशातील जनतेला मूर्खात काढलं जातंय, सरकारविरोधात जनतेने बंड पुकारलं पाहिजे”

  • by

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णसंख्या वाढत चालल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्र सरकार उचलत असलेल्या हळूवार पावलांवर आता देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिदंबरम यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर आरोग्यमंत्री डाॅ हर्षवर्धन यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वृत्त वाहिन्यांवर दाखवले जाणारे फुटेज आणि वृत्तपत्रांमधील बातम्या खोट्या आहेत का? डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक खोटं बोलत आहेत का? सगळे व्हिडिओ बनावट आहेत का? देशातील सर्व नागरिकांना मूर्ख समजणाऱ्या या सरकारविरोधात जनतेने आता बंड पुकारले पाहिजे, असं चिदम्बरम म्हणाले आहेत.