वेगळे राहण्यासाठी पती-पत्नीची कोर्टात केस होती सुरू मात्र कोरोना ने गाठताच घडले ‘ अकल्पनीय ‘

  • by

इंदुर शहरातील दाम्पत्य मनीष आणि नेहा यांचं २० नोव्हेंबर २००३ ला लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. १३ वर्ष दोघांनी संसार केल्यावर पतीने २०१६ मध्ये घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला. साधारण साडे चार वर्ष ही केस सुरू होती. पत्नीला घटस्फोट घ्यायचा नव्हता. त्यामुळे सतत काउन्सेलिंग झालं. अशात पुन्हा दोघांचा संसार सुरू होताना दिसत होता. मात्र दोघांनाही कोरोना शिकार केलं आणि दोघांचाही त्यात मृत्यू झाला.

अखेरच्या सुनावणीआधी दाम्पत्य पुन्हा सोबत जीवन जगण्यासाठी तयार झालं होतं. पण कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हे धक्का पत्नी सहन करू शकली नाही. नंतर तिचाही मृत्यू झाला. दोघांच्या मुलांचं वय १७ आणि १४ वर्षे आहे.

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, नेहाचे वकिल अमरसिंह काउन्सेलिंगमध्ये समजावत होते की, या कठिण काळात परिवार सर्वात मोठी संपत्ती आहे. मुलांना सुरक्षित ठेवणं त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. आई-वडिलांची साथ सर्वात महत्वाची आहे. त्यानंतर दोघेही सोबत राहण्यासाठी तयार होऊ लागले होते.

पत्नी नेहाने वकिल अमरसिंह राठोड यांच्या माध्यमातून घटस्फोट टाळण्यासाठी आपली बाजू मांडली होती. केस अखेरच्या टप्प्यात होती. अशात एप्रिलच्या सुरूवातीलाच मनीषला संक्रमण झालं. जे फुप्फुसात फार जास्त वाढलं होतं. नेहाने कशाचाही विचार न करता ती पतीकडे गेली. दरम्यान तिला सुद्धा कोरोनाची लागण झाली. १६ एप्रिलला मनिषचा आणि २० एप्रिलला नेहाचं निधन झालं. तिकडे फॅमिली कोर्टात फाइल उघडीच राहिली.