‘ भारतात गेलात आता येऊच नका ‘ ‘ ह्या ‘ देशाचेही दरवाजे झाले बंद

शेअर करा

भारतात कोरोनाचा उद्रेक झाला असून जगातील अनेक देशांनी मदतीचा हात दिला आहे. आवश्यक आरोग्य साधनांचा पुरवठा यामध्ये केला जातोय. दरम्यान, काही देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना भारतात जाऊ नका असा सल्ला दिला आहे. तर भारतीयांना सध्या अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे.

आता ऑस्ट्रेलियाने देखील भारतातील कोरोनाच्या स्फोटाचा धसका घेतला आहे. ऑस्ट्रेलियानं त्यांच्याच देशातील नागरिकांना भारतातून परत येण्यास बंदी घातली आहे. सरकारने 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या नागरिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेशावर बंदी घातली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, जे लोक या आदेशाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

ऑस्ट्रेलिया सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा हा आदेश दिला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रवाशांना भारतात रोखण्यासाठी कडक उपाय केले आहेत. भारतात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. देशाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सांगितलं की, तीन मेपासून हे निर्बंध लागू केले जातील. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया सरकार या निर्बंधाबाबत 15 मे रोजी पुनर्विचार करणार आहे.

हंट म्हणाले की, आम्ही भारतीय लोक आणि ऑस्ट्रेलियन भारतीय लोकांचा आदर करतो. ऑस्ट्रेलियात त्यांचे कुटुंबिय आणि मित्र अडचणीत आहेत. कोरोनामुळे दरदिवशी अनेकांचा मृत्यू होत असून हे खूप दु:खद आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 2 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी एका दिवसात देशात तब्बल 4 लाख नवीन रुग्ण सापडले. ऑस्ट्रेलियात अद्याप कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ऑस्ट्रेलियानं कोरोनाला रोखण्यासाठी भारतातून येणाऱ्या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.

सध्या आय़पीएल क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतून काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी म्हटलं की, आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनी देशात परतण्याची व्यवस्था स्वत: करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातून येणाऱ्या विमानांना ऑस्ट्रेलियात बंदी आहे.


शेअर करा