‘ ह्या ‘ शहरात लाल डोळ्यांचे १५० पेक्षा जास्त रुग्ण तर आठ जण कायमचे अंध, जाणून घेऊ काय आहे आजार ?

  • by

कोरोनाविषाणू अद्याप आटोक्यात आलेला नाही. त्यातच म्युकोरमायकोसीसने (बुरशीजन्य संसर्ग धडकी भरवायला सुरुवात केली आहे. उपराजधानी नागपूर मध्ये विविध रुग्णालयांमध्ये आतापर्यंत या बुरशीजन्य आजाराचे १५० पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून सुमारे आठ जणांची कायमची दृष्टी गेली आहे, तर अनेकांचे दात व जबडाच काढल्याची माहिती दंतचिकित्सकांनी दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये हा आजार दिसून येत असल्याने प्रशासनासमोर या बुरशीच्या रुपाने नवीन संकट उभे ठाकले आहे हे स्पष्ट आहे.

म्युकोरमायकोसीस एक जुनाच बुरशीजन्य संसर्ग आहे. या आजारात रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. या बुरशीचे रोगजंतू श्वास व त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. रुग्णांचा जबडा, हिरड्यांना सूज येते, डोकेदुखी वाढते, दातांना तीव्र वेदना होतात. ताप भरल्यासारखे वाटते. वरच्या आणि खालच्या जबड्यात ही बुरशी शिरकाव करते. काळजी घेतली नाही तर जबडा बदलावा लागतो. काही वेळा अंधत्वही येवू शकते.

म्युकोरमायकोसीस हा तसा जुनाच आजार आहे. मात्र आधी तो अभावानेच आढळायचा. मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर जे कोरोनामुक्त झाले व ज्यांना साखरेचा त्रास आहे त्यांना या बुरशीच्या संसर्गाचा त्रास जाणवत आहे. मात्र, वेळेत उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहरात म्युकोरमायकोसीसचे रोज चार ते पाच पेशंट आढळून येत आहेत. संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ, दंतवैद्य आदी डॉक्टर व संशोधक या फंगल इन्फेक्शनमध्ये अचानक होणाऱ्या वाढीबद्दल चिंतित आहेत.

स्टेरॉइड्सचा जास्त वापर केल्यामुळे बुरशीजन्य आजारास रुग्णाच्या शरीरात सक्रिय होण्यास परवानगी मिळते. म्युकोरमायकोसीस हे कोविड संसर्गकाळात आव्हान आहे.दंतचिकित्सकांना कोविडच्या काही रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसीस अचानक वाढताना दिसत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये स्टेरॉइडचा अतिवापर या संसर्गास कारणीभूत ठरत आहे.