गुड न्यूज..पाण्यासोबत मिक्स करून घ्या कोरोनाचे औषध, अखेर ‘ ड्रग्ज कंट्रोलर ‘ची मंजुरी

शेअर करा

वाढत्या कोरोना संसर्गा दरम्यान दरम्यान शनिवारी एक दिलासादायक बातमी समोर आली असून ‘ ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’नं (DGCI) करोनावर उपचारासाठी डीआरडीओकडून तयार करण्यात आलेल्या आणखीन एका औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे हे औषध सैचेत फॉरमॅट मध्ये देण्यात येणार आहे.

डीआरडीओच्या ‘इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ (INMAS) तसंच हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्रित येत हे औषध तयार केलंय. या औषधाला सध्या ‘२ डीजी’ (2 deoxy D Glucose) असं नाव देण्यात आलंय. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी लॅबला देण्यात आली आहे .

2 deoxy D Glucose हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी ठरलं आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला ते लवकरात लवकर आजारातून बरे झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. सोबतच रुग्णांची ऑक्सिजनची गरजची या औषधामुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे प्रयोगादरम्यान आढळून आल होत. या औषधाचा वापर करोना रुग्णांवर करण्यात आल्यानंतर त्यांच्यात इतर करोनाबाधित रुग्णांपेक्षा कमी वेळेत परिणाम दिसून येत आहे. या रुग्णांचा करोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. अर्थात ते लवकर बरे होत आहेत.

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल २०२० मध्ये लॅबमध्ये या औषधाचा प्रयोग केला होता. करोना विषाणूचं सक्रमण रोखण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं. याच आधारावर ‘डीसीजीआय’नं मे २०२० मध्ये या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली होती.

सध्या पावडरच्या स्वरुपात मिळणारं हे औषध पाण्यात मिसळून रुग्णाला दिलं जातं. हे औषध संक्रमित पेशींत जमा होतं. त्यामुळे विषाणूचं वाढतं संक्रमण रोखण्यात त्याचा उपयोग होतो. संक्रमित पेशी शोधून काढून विषाणूला आळा घालण्यासाठी हे औषध उपयोगी ठरतं. या औषधामुळे रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम कमी होऊ शकतो तसेच ज्या रुग्णाची इम्म्युनिटी अधिक चांगली आहे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रभावी हे औषध ठरू शकेल.

देशभरातील रुग्णालयांत या औषधाची तिसरी ट्रायल पार पडली. तिसरा टप्पा डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत देशातील २७ रुग्णालयांत पार पडला. यात २२० रुग्णांचा समावेश करण्यात आला. यात ज्या रुग्णांवर ‘२ डीजी’ या औषधाचा वापर करण्यात आला त्यातील ४२ टक्के रुग्णांची ऑक्सिजनवरच अवलंबित्व तिसऱ्याच दिवशी संपुष्टात आलं. ही ट्रायल महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये करण्यात आली होती . मोठ्या प्रमाणात हे औषध उपलब्ध झाल्यास निश्चितच त्याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल.


शेअर करा