सरकारी विभागात कार्यरत असलेल्या मद्यधुंद महिलेने पीएसआयला बोचकारले अखेर ..

  • by

सरकारी विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेच्या कारनाम्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेने दारूचे सेवन करुन भर चौकात धिंगाणा घातला होता अखेर अचलपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद करत त्या महिलेला सुपूर्द नाम्यावर पतीच्या स्वाधीन केलं आहे .

परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातील लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या या महिलेने अंमली पदार्थाचे सेवन करुन चांगलाच धिंगाणा घातला होता. दरम्यान सदर महिलेने वनविभागातील कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उचलत शिवीगाळ केली होती. त्यानंतर महिलेला आरोग्य तपासणीसाठी नेलं असता तिने अचलपूर पोलीस स्टेशनमधील महिला पीएसआयसोबत वाद घालून त्यांनाही नखाने ओरबाडत जखमी केले होते. या महिलेचे असभ्य वर्तन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे तीन तास म्हणजेच दुपारी २ पासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.

नशेत असलेल्या या लेखापाल महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिलेला सुपूर्द नाम्यावर पतीच्या स्वाधीन केले. या महिलेच्या वर्तवणुकीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. उपवनसरंक्षक चंद्रसेखरन बाला यांनी बुधवारी महाराष्ट्र नागरहक सेवा शिस्त व अपील नियमान्वये तत्काळ या महिला लेखापालास निलंबित केले आहे.