कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या निलेश लंकेचा ‘ हा ’ फोटो पाहिलात का ?

शेअर करा

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यात सध्या हाहा:कार उडाला आहे. राज्यात हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, औषधी कमी पडत असताना अनेकजण मदतीसाठी सरसावत आहेत. अनेकजण सढळ हाताने सरकारला मदत करत आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी निलेश लंके हे सर्वात जास्त अग्रेसर राहिलेले आहेत . 1 हजार बेडचं कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारल्यानंतर आता लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे .

कोरोनाग्रस्तांना योग्य उपचार मिळावेत म्हणून निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने तब्बल 1 हजार बेड्सचे कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारले. निलेश लंके यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये जेवणाची तसेच उपचाराची सोय आहे. याच कोविड सेंटरमुळे लंके यांची संपूर्ण महाराष्ट्रमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला आहे. तसा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस अपेटड्स या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

या फोटोमध्ये निलेश लंके आमदारकीचा कोणताही बडेजाव न मिवरता गरीब आणि सामान्य लोकांमध्ये झोपल्याचे दिसत आहेत. अंगवार काहीही नसताना ते शांतपणे झोप घेताना दिसतायत. त्यांच्या आजूबाजूला नागरिक आराम करत आहेत. लंके यांच्या आजूबाजूला झोपलेले कोरोनाग्रस्त आहेत की नेमके कोण हे सांगणे कठीण असले तरी ते कोविड सेंटरच्या परिसरात झोपलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांचा हाच फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लंके यांनी उभ्या केलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती.


शेअर करा