नगर शहराने मोडले रेकॉर्ड.. आज शहरात तब्बल ‘ इतके ‘ रुग्ण आढळले

शेअर करा

जिल्ह्यात करोना नियंत्रणात येत असल्याचे वाटत असतानाच आज तब्बल २४ बाधित रुग्ण जिल्ह्यामध्ये आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक १८ रुग्ण हे नगर शहरातील आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३२८ वर पोहचली असून सध्या ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
.
नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या करोना बाधित रुग्णांचा बरा होण्याचा वेग वाढला होता.त्यामुळे लवकरच जिल्ह्यात करोना परिस्थिती नियंत्रणात येईल, असे वाटत होते. मात्र आज नगरकरांसाठी चिंतेत भर टाकणारी बातमी आल्याने महापालिका प्रशासन देखील सतर्क झाले आहे. एकाच वेळी शहरात तब्बल १८ रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागासह नगरकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे, मात्र ९० जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह देखील आलेले आहेत.

नगर शहरामध्ये एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ज्या भागात रुग्ण आहेत तेथील भाग सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे कामही आरोग्य विभागाने तातडीने सुरू केले आहे.तोफखाना, सिद्धार्थ नगर,नालेगाव, बालिकाश्रम रोड आणि दिल्लीगेट परिसरात हे रुग्ण आढळले आहेत. उर्वरित इतर रुग्णांमध्ये संगमनेर तालुक्यात चार श्रीरामपूर तालुक्यात एक व जामखेड तालुक्यातील एक असे आणखी सहा रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये आज पाच रुग्ण करोना आजारातून बरे झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये संगमनेर येथील तीन, कर्जत येथील एक आणि नगर शहरातील एका जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २५४ झाली आहे.


शेअर करा