‘ मसाज पार्लरमधील महिलेसोबत तुमचे अनैतिक संबंध आहेत ‘ अचानक कॉल आला अन त्यानंतर….

शेअर करा

मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या पत्नीचे एका ग्राहकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. याचाच गैरफायदा घेत महिलेच्या पतिने खोटा पोलिस अधिकारी बनून ग्राहकाकडून पाच लाख रुपये उकळले. आणखी पाच लाख रुपयांची रक्कम घेताना या तोतया पोलिसाला कल्याणमधील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तुषार शिलवंत असे आरोपी पतीचे नाव आहे.

ठाण्यातील संबंधित मसाज पार्लरमध्ये जाणे डोंबिवलीतील एका ग्राहकाच्या चांगलेच अंगलट आले. डोंबिवलीत सागर्ली परिसरात राहणारे शंकर परब हे काही दिवसांपूर्वी मसाज पार्लरमध्ये गेले होते. मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेशी त्यांची ओळख झाली. त्याचं रुपांतर पुढे मैत्रीत झालं मात्र सदर महिलेचा पती हा ह्या सर्व गोष्टीवर लक्ष ठेऊन होता त्यातच त्याला यात एक आयडिया सुचली.

एके दिवशी शंकर परब यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख वाशी येथील क्राईम ब्रांच युनिटचा पोलिस अधिकारी अशी सांगितली. मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत तुमचे जे अनैतिक संबंध आहेत, त्यावरुन आम्ही कारवाई करणार आहोत. कारवाई टाळायची असल्यास दहा लाख रुपये द्या, असं फोनवरील व्यक्तीने सांगितलं.

शंकर परब चांगलेच घाबरले. त्यांनी लगेच आरोपीला पाच लाख रुपये देण्यासाठी बोलावले. मात्र पैसे देण्याआधी त्यांना शंका आली. त्यामुळे शंकर यांनी मानपाडा पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अनंत लाम आणि सिनिअर पीआय दादा हरी चौरे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस तपास सुरु झाला. सापळा रचून तुषार शिलवंत याला अटक करण्यात आली आणि त्याचा भांडाफोड आला

तुषारच्या अटकेनंतर धक्कादायक प्रकार समोर आला. तुषार हा मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेचा पती आहे. त्यांच्यात वाद सुरु आहे. ते दोघं वेगळे राहतात. फक्त पत्नीसोबत शंकरची यांची मैत्री आहे, याचा फायदा घेत त्याने ब्लॅकमेल केले. तुषार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडाला. तुषारच्या पत्नीचा देखील या गुन्ह्यात कितपत सहभाग आहे, याचा पोलिस तपास करत आहेत.


शेअर करा