बायको नि मुले निघाले त्याच्यादेखील पुढचे.. आयुष्यभर लक्षात राहील ‘ अशी ‘ केली शिक्षा

शेअर करा

चित्र प्रतीकात्मक

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन कमी जास्त प्रमाणात असल्याने प्रेमीयुगुलांच्या गाठीभेटी थांबल्या आहेत. त्यांना सध्या विरहाचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र तरीदेखील चोरून लपून भेटीगाठी करण्यासाठी काही प्रेमवीर कोणतीही रिस्क घेण्यास तयार आहेत . अशाच एका पुण्यातील वाकड भागातील व्यावसायिकाने आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी रिस्क घेतली मात्र विवाहित असून दोन मुले असलेल्या ह्या व्यावसायिकास ही रिस्क भयानक महागात पडली .

आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घरी व्यावसायिकाने काहीतरी बहाणा सांगितलं आणि घराबाहेर पडला. विशेष म्हणजे ह्या बांधकाम व्यावसायिकांचे वय हे ४८ असून लक्ष्मीतारा गार्डन, डांगे चौक, वाकड इथे हा व्यावसायिक राहतो. आपले वडील कशासाठी बाहेर चालले आहेत हे त्या व्यावसायिकाच्या चाणाक्ष पोरांनी बरोबर ओळखले. मुले देखील वयानी २१ आणि १८ आहेत .आईला विश्वासात घेऊन मग त्यांनी वडिलांचा पाठलाग सुरू केला .

वडील मैत्रिणीच्या घरी पोहचले आणि काही वेळातच ह्या व्यावसायिकाची पत्नी आणि मुलांची अचानक त्या मैत्रिणीच्या घरावर धाड टाकली. आपण रंगेहाथ धरले केल्यावर सदर व्यावसायिकाकडे बोलण्यासारखे काही राहिले नव्हतेच त्यामुळे मुले आणि बायकोने मिळून त्याला घरी आणले. घरी आल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देताच मुलांनी आणि बायकोने त्याला जबरदस्त झोडपून काढले. बायकोने यावेळी धरून ठेवले आणि मुलांनी जबरदस्त मारहाण केली. कमरेच्या चामड्याच्या बेल्टने मुलांनी मारहाण केल्याने ह्या व्यावसायिकाचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता . दिनांक २१ जूनला रविवारी ही घटना घडली.

त्यानंतर या व्यावसायिकाने पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर ह्या व्यावसायिकाने आपली पत्नी व मुलांच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी तात्पुरता समेट घडवून आला आहे मात्र ह्या व्यावसायिकांवर त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची वेळ आली. एकंदरीत मैत्रीणीला भेटण्यासाठी घेतलेली रिस्क बरीच महागात पडल्याची परिसरात चर्चा आहे .


शेअर करा