आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, एकाच वेळी पुण्यात छापे

शेअर करा

आयुर्वेदिक स्पा सेंटरची लालूच दाखवून महिलांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या एक जणाला चतु:श्रृंगी पोलिसांनीअटक केली असून महिलांना जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा ठपका ह्या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे . सुरेश प्रल्हाद रणवीर (वय २५, रा़ बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाणेरमधील धनकुडे वस्तीलगत पाषाण टेकडीजवळ एका रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त सूत्रांच्या आधारे मिळाली होती .त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी फिल्डिंग लावून तिथे छापा टाकला आणि चार महिलांची सुटका केली.

पुणे पोलिसांनी अशा स्पा सेंटर्सच्या विरोधात आज धडक कारवाई केली असून इतरही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत .धनकवडी येथील चैतन्यनगरमधील आयुर्वेदिक मसाज सेंटर वर छापा टाकून तब्बल पाच महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले.

हडपसर येथील भोसले गार्डनमधील न्यू लोटस आयुर्वेदिक पंचकर्म हे मसाज सेंटर सुरु होते. तेथे छापा घालून २ महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. मंत्रा स्पा व मसाज सेंटर हे चालू असल्याची माहिती मिळाल्यावरुन तेथे छापा घालून ३ महिलांना ताब्यात घेण्यात आले.


शेअर करा