लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री एक वाजता नवरी फरार, आता म्हणतेय की.. ?

शेअर करा

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच पळालेली नवरी तिच्या प्रियकरासोबत सापडली आणि यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथं युवतीनं आपलं लग्न जबरदस्तीनं लावून दिल्याचं सांगत प्रियकरासोबत राहण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीला तिच्या प्रियकरासोबत पाठवून दिले आहे .

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील आमाडूला गावात लग्न करून आलेली नवी नवरी पळाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी कांकेर जिल्ह्यातील भैसाकन्हार गावात राहणारी असून 2 मे रोजी तिचं लग्न झालं होतं. 3 मेला ती सासरी आली. कोविड गाइडलाइन्स असतानाही तिच्या सासरच्या घरासमोर गर्दी जमा झाली होती आणि लग्नानंतरचे पारंपरिक कार्यक्रम सुरू होते. यामध्ये पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने हस्तक्षेप केल्यानंतर तिथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. याचा फायदा घेऊन नवी नवरी त्याच रात्री एक वाजता सासरच्या घरातून प्रियकरासोबत पळाली.

खूप शोधल्यानंतर ही नवरी न सापडल्याने गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुसऱ्या दिवशीही तिच्या माहेर आणि सासरच्या लोकांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिचा पत्ता लागला नाही. शेवटी तरुणीच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी डौंडी पोलीस ठाण्यात नवविवाहिता हरवल्याची तक्रार नोंदवली.

ठाणे प्रभारी अनिल ठाकूर यांनी सांगितलं की, तक्रार दाखल झाल्यानंतर ही नवविवाहिता तिच्या प्रियकराच्या घरी असल्याचं समजलं. 13 मे रोजी या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. इथं केलेल्या चौकशीत तरुणीनं हे लग्न आपल्या मनाविरुद्ध झाल्याचं सांगत प्रियकरा सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. तिनं न्यायालयातही तसंच सांगितलं. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तिला तिच्या प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिली.

तीन मे रोजी दीपिका नेताम (वय 22) तिचा प्रियकर टकेश्वर श्वेत (वय 23) याच्यासोबत बाईकवरून पळाली. या दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन आधीच केला होता. पळून जाण्याच्या दिवशी तरुणीच्या प्रियकराने तिच्या सासरच्या घराभोवती फिरून रेकी केली. ठरल्यानुसार, तरुणी रात्री 1 वाजता सासरच्या घरातून बाहेर पडली आणि प्रियकरासोबत निघून गेली.

या प्रकरणाबाबत बोलताना वरिष्ठ वकील राजकुमार तिवारी म्हणाले की, पळून गेलेले आणि एकमेकांसोबत राहण्याची इच्छा असलेले दोघेही सज्ञान आहेत. मात्र, संबंधित तरुणी विवाहित असल्यानं तिला तिच्या प्रियकरासोबत दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी आधीच्या पतीला घटस्फोट द्यावा लागेल. तरच, ती तिच्या प्रियकरासोबत लग्न करू शकेल.


शेअर करा