बलात्कारानंतर थकल्यामुळे तिथेच झोपले, पुढे उच्च न्यायालयापर्यंत पोहचले ‘ हे ‘ अजब प्रकरण

शेअर करा

एका उच्चभ्रू महिलेने तिच्या सोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयात तिने जे म्हणाले मांडले ते ऐकून न्यायालयाला सुद्धा प्रकरणाचा गंभीरपणे विचार करणे भाग पडले. मात्र न्यायालयाने त्यावर ‘ भारतीय महिला असे करत नाहीत ‘ असे सांगत कथित आरोपीस जामीन मंजूर केला आहे . कथित आरोपीचे वय हे २७ वर्षे असून तो आरोप केलेल्या ४२ वर्षीय महिलेच्या सोबत काम करतो.

२ मे रोजी बंगळुरू येथील आर आर नगर पोलीस स्टेशनमध्ये ह्या महिलेने आपल्या कर्मचाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. गेल्या दोन वर्षांपासून तिच्यासोबत हा कर्मचारी काम करत होता. लग्नाचं आमिष दाखवत त्यानं आपल्यावर बलात्कार केला असे ह्या महिलेचे म्हणणे होते. आरोपी आपल्यासोबत कारमध्ये बसून कार्यालयात आला. कार्यालयात आल्यावर त्याने आपल्यावर बलात्कार केला, असे ह्या महिलेचे म्हणणे होते .

पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३७६ (बलात्कार), ४२० (फसवणूक) आणि ५०६ (धमकी देणं) आणि आयटी ऍक्ट २००० च्या ६६ बी च्या कलमानुसार गुन्हा दाखल केला केला होता . पुढे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते यावेळी ह्या कथित आरोपीस जमीन मंजूर करण्यात आला तसेच कर्नाटक उच्च न्यायालयानं तरुणावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या वर्तणुकीवर ‘ भारतीय महिला असे करत नाहीत ‘ अशी टिप्पणी देखील केली.

कोर्टासमोर नोंदवलेल्या जबाबामध्ये महिलेने ‘बलात्कारानंतर थकल्यामुळे तिथेच झोपले’ असे म्हणणे ह्या महिलेने मांडले होते. सदर महिलेचे वय हे ४२ वर्षे असून आरोपीचे वय २७ वर्षे आहे . ‘तक्रारदार महिलेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की बलात्कारानंतर ती थकली आणि त्याच ठिकाणी झोपली. एका भारतीय महिलेसाठी हे अशोभनीय वर्तन आहे. एक भारतीय महिला बलात्कारानंतर असं वागत नाही’ अशी प्रतिक्रिया या प्रकरणात उच्च न्यायालयानं दिली आणि आरोपीस जमीन मंजूर करण्यात आला.


शेअर करा