..अखेर खुंटेफळच्या ‘ त्या ‘ अल्पवयीन मुलाच्या हत्येचे रहस्य उलगडले , पोलिसही हैराण

शेअर करा

शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या अकरा वर्षीय मुलाच्या हत्येचा तपास लावण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. गावातील एका अल्पवयीन मुलानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.

खुंटेफळ ता. शेवगाव येथे (ता. 10 मे) सार्थक अंबादास शेळके या अकरा वर्षीय मुलाची त्याच्या राहत्या घरात हत्या झाली होती. विळीच्या साह्याने गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्येमधील मारेकरी अज्ञात असल्याने पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, विश्वास पावरा, मिथुन घुगे, पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवस तपास केला.

चौकशीसाठी चार ते पाच संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात त्यांना काही माहिती समोर आली. गावातील एक सतरा वर्षाच्या मुलाने आपली चोरी उघड होऊ नये म्हणून त्याने सार्थकला संपले. तो शेळके यांच्या घरात चोरी करीत होता. ते सार्थकने पाहिले पाहिले होते. त्या अल्पवयीन मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. त्या अल्पवयीन आरोपीस श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


शेअर करा