बायकोच्या अनैतिक संबंधांना कंटाळलेल्या नवऱ्याने केले ‘ असे ‘ काही ? : महाराष्ट्रातील बातमी

  • by

तो तिच्या अनैतिक संबंधांना कंटाळला होता .वारंवार सांगून देखील पत्नीच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने चक्क महिलेच्या पतीनेच सुपारी देऊन पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे . मुंबई-आग्रा महामार्गालगत राहुड शिवारात मंगळवार (दि. १६) नाल्यात एका महिलेचा मृतदेह नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या हद्दीत आढळून आला होता . काही दिवसातच ह्या महिलेची ओळख पटवून आरोपींपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले. पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीनेच तिच्या खुनाची सुपारी दिल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी पती व त्याच्या साथीदाराना गजाआड केले आहे.

नीता नारायण चित्ते (वय ३९, रा. चित्ते प्लाझा, प्लॉट नंबर ०१, गजपंथ म्हसरूळ, नाशिक) या मृत महिलेचे नाव आहे . तिचा पती नारायण चित्ते हा तिच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळला होता. याविषयी पतीने टीका कित्येक वेळा सांगून देखील पाहिले होते मात्र तिच्या वर्तणुकीत बदल होत नव्हता .

तिच्या अनैतिक संबंधांना कंटाळून तिचा खून केल्याची कबुली पती पती नारायण चित्ते याने पोलिसांना दिली आहे. पतीला एकट्याला हे शक्य होणार नव्हते म्हणून त्याने त्याचा मित्र विनय निंबाजी वाघ (वय ५२ , गुलमोहर नगर, म्हसरूळ) व भरत देवचंद मोची उर्फ मोरे (२८ , रा. भीमनगर, उल्हासनगर) यास १० लाखाची सुपारी दिली.

नीता ही रविवारी पती नारायण चित्ते यास सांगून सिडकोत माहेरी गेली होती. दरम्यान भरत देवचंद मोची उर्फ मोरे याने आपला मित्र वाहिद अली शराफत अली (रा. पंचशील नगर, उल्हासनगर) याला नीताशी व्हाट्सएप्प वर मैत्री करण्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या. वाहिद अली शराफत अली याने नीताशी मैत्री केली आणि तिचा विश्वास संपादन केलेला असल्याने त्यांनी नीताला आडगाव नाक्यावरील उड्डाणपुलाजवळ बोलविले आणि त्याप्रमाणे नीता तिथे आली.

आता काम तडीस जाण्यास केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला होता. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी नीता हिला स्विफ्ट कार (एम एच ०१, पीए ५६३२) मध्ये बसविले व राहुड घाट परिसरात नेले . घाटात गेल्यावर तिचा गळा आवळून खून केला . पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह महामार्गालगतच्या नाल्यात फेकून दिला. काम पूर्ण झालेले असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी विनय वाघ यांच्याकडून पाच लाख रुपये घेण्यात आल्याचे देखील उघड झाले आहे. विनय वाघ यास देखील अटक करण्यात आलेली आहे .

नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात संबंधित महिला हरविल्याची तक्रार तिच्या पतीनेच दाखल केलेली होती त्यानुसार तपासाला गती देत पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला. विक्रमी वेळेत गुंतागुंतीच्या ह्या प्रकरणाचा तपास लावल्याने पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे .