देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फेसबुकवर गंभीर चूक,महाराष्ट्र बचावची सगळी बनवाबनवी उघड : काय आहे प्रकार ?

शेअर करा

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूरला आपल्याला सोशल मीडियामधून ट्रॉल केले जात असल्याबद्दल तक्रार केली होती अर्थात राजकीय नेत्यांना ट्रॉल केले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल रीतसर तक्रार केली .राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्रोल जन्माला घालणाऱ्यांवर ही वेळ यावी याला काळाचा महिमा म्हणतात अशी प्रतिक्रिया देखील दिली होती .

काल भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन केले यात भाजपच्या नेत्याचा काही प्रमाणात सहभाग होता मात्र जनतेने हा आंदोलनाकडे पाठ फिरवली. भाजपच्या आंदोलनाचे फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल देखील झाले . राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या व्हेरीफाईड फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी केलेल्या आंदोलनाचे काही फोटो शेअर केले आहेत तसेच सोबत Maximum patients! Maximum deaths! असे वर्णन करून त्यांनी हे फोटो टाकले आहेत .

शेअर केलेल्या फोटोत नेमके चुकलंय काय ?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करताना त्यातील एक फोटो हा बुरखाधारी महिलेचा असून जाणीवपूर्वक आमच्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाचा देखील पाठिंबा आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयन्त केला आहे मात्र हा फोटो टाकताना सदर महिलेच्या डोक्यावर चक्क लाल रंगाची टिकली लावलेली आहे आणि मुस्लिम महिला डोक्याला टिकली लावत नाहीत हे सांगायची वेगळी काय गरज नाही. याआधी देखील असे प्रकार घडलेले आहेत मात्र चक्क माजी मुख्यमंत्री जेव्हा आपल्या फेसबुकच्या व्हेरीफाईड प्रोफाईलवरून असे फोटो शेअर करतात तेव्हा हा सगळा प्रकार बनवाबनवीचाच असल्याचे दिसून येते.आतापर्यंत देखील म्हणजे पोस्ट टाकेपर्यंत देखील तो फोटो तसाच आहे आणि भाजपच्या आंदोलनाच्या फोलपणाची साक्ष देत आहे . असे प्रकार लोकांच्या लक्षात आल्यावर ट्रॉल केले जाणे स्वाभाविक आहे याची जाणीव तमाम भाजपच्या लोकांना यापुढील काळात घेणे गरजेचे आहे.

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत
https://nagarchaufer.com/?p=59

सर्वच काळे करा म्हणजे येड्यांची जत्रा : सामनामधून भाजपचा जबरदस्त समाचार
https://nagarchaufer.com/?p=39

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56


शेअर करा