.. आणि ‘ म्हणून ‘ चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या मागे चप्पल घेऊन धावली महिला : पहा व्हिडीओ

शेअर करा

पती पत्नीचे रस्त्यावर भांडण सुरु झाले की उपस्थित लोकांचे चांगलेच मनोरंजन होते, असाच एक प्रकार मध्यप्रदेशात घडला असून अशोकनगर येथे मास्क न घालणाऱ्या पतीला 100 रुपयांचा दंड भरावा लागला म्हणून त्याची पत्नी प्रचंड संतापली. तिनं पतीवर कारवाई करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर चप्पल उगारली अन् शिवीगाळ केली.

चंदेरी येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. महिलेनं त्या अधिकाऱ्याला मारण्यासाठी चप्पल हातातच घेतली नाही, तर त्याला मारण्यासाठी ती मागेही धावली. महिलेच्या रोषापासून वाचण्यासाठी अधिकाऱ्यानं स्वतःला आपल्याच गाडीत बंद केले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेवर व तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे .सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.

चंदेरी येथील ढोलिया दरवाजाजवळ रात्री 8 वाजता अधिकारी व पोलिस यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात येत होती. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ते दंड वसूल करत होते. एसडीएम देवेंद्रप्रात सिंह हेही त्या तुकडीसोबत होते. यावेळी पवन पुत्र पुरुषोत्तम सोनी नावाची व्यक्ती मास्क न घातला तिथून जात होती आणि त्या व्यक्तीकडून 100 रुपयांचा दंड वसूलण्यात आला. पवननं ही गोष्ट घरी येताच पत्नीला सांगितली. आपल्याला मारहाणही झाल्याचे त्यानं पत्नीला सांगितलं.

पतीला मारहाण झाल्याचे ऐकून हेमलता सोनी ही भडकली आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यासाठी घटनेच्या ठिकाणी पोहोचली. हेमलतानं SDM देवेंद्रप्रताप सिंह यांना चप्पलेनं मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण, अन्य लोकांनी तिला अडवलं. तरीही ती SDM ला मारण्यासाठी त्यांच्या मागे धावली नंतर पवन व हेमलता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक केली गेली.


शेअर करा