लग्नानंतर तीनच महिन्यात बायको रुसून साडूच्या घरी , पाठोपाठ पती पोहचला मात्र

शेअर करा

पती-पत्नीचं एक पवित्र असं नातं असतं. दोघांमध्ये जितकी भांडणं होतात तितकंच त्यांच्यातील प्रेम आणखी घट्ट होत जातं, असं म्हटलं जातं. पण हरियाणा राज्यातील हिसार शहरात विचित्र घटना घडली आहे. एका दाम्पत्याच्या लग्नाला अवघे तीन महिने होत नाही तेवढ्यात दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर पत्नी रागात आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली. पती तिची मनधरणी करण्यासाठी तिथे गेला असताना रागावलेली पत्नी आणि साडू यांनी संतापात त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले यातच पतीचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे हिसार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना ही हिसारमधील हासी येथे घडली आहे. मृतक पती जोगेंद्र हा रायपूर रोड येथे वास्तव्यास होता. तीन महिन्यांपूर्वी त्याचं हांसी येथील न्यू सुभाष नगर येथे वास्तव्यास असलेल्या अस्मिता नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये वारंवार वाद सुरु असायचा. अखेर एके दिवशी वाद इतका टोकाला गेला की, अस्मिता रागात आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली. तिची बहिण हिसारच्या प्रेम नगर येथे वास्तव्यास होती.

पत्नी रागात बहिणीच्या घरी निघून गेल्यानंतर जोगेंद्रला पश्चाताप झाला. त्याने रुसलेल्या पत्नीची मनधरणी करण्याचा विचार केला. त्यासाठी तो 18 मे रोजी आपल्या साडूच्या घरी म्हणजेच अस्मिताच्या बहिणीच्या घरी गेला. तिथे त्याने अस्मिताचा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला घरी येण्यासाठी विनंती केली. मात्र, अस्मिताचा रागाचा पारा आणखी वाढला. तिच्यासोबत तिची बहीण आणि भाऊजी दोघे होते. तिघांनी जोगेंद्रला घरी जाण्यास सांगितलं. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की, अस्मिताने पतीच्या अंगावर पेट्रोल टाकलं. त्यानंतर पेटवून दिलं. या आगीत जोगेंद्र प्रचंड भाजला.

जोगेंद्रच्या वडिलांना रात्री आठ वाजता अस्मिताच्या बहिणीने फोन केला. जोगेंद्रने स्वत:ला आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, असं तिने सांगितलं. जोगेंद्रचे वडील हरपाल तातडीने घटनास्थळी पोहोचले. जोगेंद्रला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं जात होतं. यावेळी अर्ध्या वाटेत असताना जोगेंद्रने श्वास सोडला. पण त्याआधी त्याने घडलेली सर्व घटना आपल्या वडिलांना सांगितलं.

जोगेंद्रच्या माहितीनुसार हरपाल यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. जोगेंद्रचा साडू राजेशने त्याचे हात पकडले. तर त्याच्या पत्नीने जोगेंद्रच्या अंगावर पेट्रोल टाकलं. त्यानंतर अस्मिताने आग लावून पेटवून दिलं, अशी तक्रार हरपाल यांनी पोलिसात केली. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेत जोगेंद्रने सांगितलेली सर्व माहिती व्हिडीओ कैद असल्याचा दावा हरपाल यांनी केला आहे. हरपालच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी पत्नी, तिची बहीण आणि जोगेंद्रच्या साडूच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा