नगरसाठी अलर्ट..नवीन कोरोनाबाधितांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण ‘ इतके ‘ टक्के

शेअर करा

करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.मात्र, बाधितांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण लक्षणीय असल्याने ती धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १ हजार ८५१ करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी सुमारे पावणेचारशे रुग्ण १८ वर्षांच्या आतील आहेत. त्यातही सात ते १४ वयोगटातील मुलांचे प्रमाण लक्षणीय असून नगरची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांना अल्पवयीन मुलांचे प्रमाण २० टक्केपेक्षा जास्त आढळून आल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे .

सुमारे दीड महिन्यानंतर जिल्ह्यातील रुग्णालयातील गंभीर रुग्णांसोबतच कोविड केअर सेंटरमधील खाटाही रिकाम्या होताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात साडेचार हजारांवर गेलेली दैनंदिन रुग्णांची संख्या आता दोन हजारांच्या आत आली आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ८५१ नवे रुग्ण आढळून आले. चौदापैकी पाच तालुक्यांतील रुग्ण संख्या दोन अंकी आहे. सर्वाधिक २२० रुग्ण संगमनेर तालुक्यात आहेत. पारनेर, अकोले, नगर तालुका, श्रीगोंदा येथील दीडशेहून अधिक रुग्ण आहेत. नगर शहरातही कमालीची घट पहायला मिळते आहे .

संख्या कमी झाली असली तरी नवीन बाधितांमध्ये मात्र नव्या बाधित रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. १ हजार ८५१ पैकी सुमारे पावणेचारशे रुग्ण १८ वर्षांच्या आतील आहे. १ वर्षाच्या बालकालाही करोनाची लागण झालेली असल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे . सर्वाधिक रुग्ण ७ ते १४ या वयोगटातील आहेत.

बहुतांश रुग्ण कमी तीव्रतेची लक्षणे असलेले आहेत. गंभीर रुग्ण जवळपास नाहीत. असे असले तरी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. सध्या कडक लॉकडाऊन असला तरी खेळण्यासाठी आणि अन्य कारणांसाठी मुले बाहेर पडण्याचे, एकत्र मिसळण्याचे प्रमाण अधिक आहे. कुटुंबातील सदस्य अगर अन्य ठिकाणांहून संसर्गाची लागण झाल्याने मुलांमार्फत त्याचा प्रसार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आतापर्यंतचा आनुभव लक्षात घेता करोनाची जास्त प्रमाणात लागण होणारा वयोगट कमी कमी होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांचे प्रमाण अधिक असून शकते, हे गृहीत धरून प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स कार्यरत केला असून त्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधा आणि प्रशिक्षणाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

कर्नाटकने देखील वाढवलीय चिंता

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्याच लाटेने देशात हाहाकार माजवलेला असताना कर्नाटकमध्ये अचानकपणे लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मुळते आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये 0-9 या वयोगटातील मुलांना झालेला संसर्ग हा 18 मार्चपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या तब्बल 143 टक्के, 10-19 वयोगटात 160 टक्के वाढल्याचे दिसून आले.

राज्याच्या वॉर कोरोना रुमनुसार , 0-9 या वयोगटातील 39, 846 मुलं, तर 10-19 वयोगटातील 1,05,044 मुलांना 18 मार्च ते 18 मे या कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून या 18 मार्चपर्यंत या वयोगटातील रुग्णांची संख्या २७, ८४१ आणि ६५, ५५१ होती. येत्या १८ मार्चपर्यंत २८ मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर १८ मेपर्यंत १५ मुलांची आणखी त्यात भर पडली. गेल्या दोन महिन्यात किशोरवयीन मुलांमधील मृत्यू हे ४२ वरून ६२ वर पोहोचले. लहान मुलांमधील मृत्यूचा सरासरी दर हा दुसऱ्या लाटेमध्ये तीनपटीने वाढला, तर किशोरवयीन मुलांमध्ये दुप्पट झाला आहे. ( Third wave of corona virus )

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यानंतर दोनच दिवसांत संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच काही प्रकरणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पालकांमुळेच लहान मुलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर सर्वाधिक प्रकरणांमध्ये लहान मुलेच हे त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वात आधी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण लवकर होत असून त्यांच्यामुळे घरातील प्रौढ व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. एकदा लहान मुलांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या पालकांनी देखील त्यांच्यासोबत स्वतःला विलगीकरणात ठेवणे गरजेचे असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. ( High rise in corona cases inside Karnataka )

आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येकी १० मुलांपैकी केवळ एकाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत असते, तर इतर घरातच उपचार घेऊन ठीक झाले असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. तसेच मुलांना ताप, खोकला, हगवण आणि उलट्यांचा त्रास होत असेल तर कोरोना टेस्ट लगेच करून घ्यावी. तसेच लहान मुलांचे सीटी स्कॅन, डी जायमर टेस्ट किंवा ब्लड टेस्ट न करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला. (Corona Symptoms in kids )

अनेक पालकांना कोरोनाची लागण झाल्यास मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडे ठेवतात. मात्र, लहान मुलांमुळे कोरोना वेगाने पसरतो. त्यामुळे त्यांच्यापासून वृद्धांना धोका असतो. त्यामुळे याबाबत पालकांनी खबरदारी घ्यायला हवी, असेही डॉक्टर म्हणाले. वृद्धांना प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे झटपट कोरोनाची लागण होते तसेच इतरही काही आजार असल्यास कोरोनाचे आणखी दुष्परिणाम होतात असेही डॉक्टर म्हणाले.


शेअर करा