चार बायकांचा दादला अखेर बायकोनेच संपवला,सुपारी किलरची पण पहिलीच सुपारी : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

सामान्य माणसे एकतर अरेंज मॅरेज करतात किंवा प्रेमविवाह, मात्र एकदा लग्न झालं की बायका मुले यात रममाण होऊन जातात मात्र एक असा व्यक्ती होता की ज्याला प्रेमविवाह करण्याचा नाद लागला होता . एका पाठोपाठ त्याने तब्बल चार प्रेमविवाह केले मात्र अखेर त्याच्या पहिल्या बायकोने त्याची सुपारी देऊन त्याला संपवले कारण त्याने आपल्या पहिल्या बायकोबद्दल नंतरच्या बायकांना एक खोटी माहिती सांगितली होती.

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे . मृत युवक विकास ऊर्फ नीटू (३५) हा बड़ौली गावचे रहिवासी नरसिंह यांचा मुलगा होता. तो दिल्लीत एका खासगी कंपन्यांसाठी प्लेसमेंट एजेंसी चालवत होता . त्याने एका पाठोपाठ चार महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केली होती विशेष म्हणजे विकासला पहिल्या बायकोपासून २ मुले देखील आहेत. आपली सर्व प्रॉपर्टी तो इतर महिलांना देणार होता त्यामुळे विकासने कामावरून काढलेल्या सुधीर नावाच्या माणसाशी विकासच्या बायकोने संपर्क साधला आणि विकासाला मारण्याचा प्लॅन रचला.

पाच दिवसांपूर्वी विकास गावात आला होता. गावात आल्यावर तो गावातील घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या दुसर्‍या घरात झोपला होता. त्यावेळी तीन सुपारी किलर दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार करून विकासला ठार मारले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ माजली. विशेष म्हणजे सुपारी किलर यांनी हा धंदा नवीनच सुरु केला होता आणि विकासच्या पहिल्या बायकोने (रजनीने ) सुधीरला हाताशी धरून त्यांना ह्या खुनाची सुपारी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाच्या पहिल्या पत्नीने संपत्तीच्या वादातून सुपारी देऊन पतीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपी आणि मृताच्या पत्नीला अटक केली आहे. हत्येमध्ये वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. विशेष म्हणजे ह्या युवकाच्या हत्येच्या सुपारीची किंमत ही देखील तब्बल १ कोटी रुपये होती.

खून झालेल्या विकासने चार प्रेम विवाह केले होते मात्र विकासने आपली पहिली पत्नीची ओळख नोकर म्हणून इतर बायकांसमोर ठेवली होती . त्यामुळे विकास त्याच्या पहिल्या पत्नीच्या निशाण्यावर होताच . त्यानंतर विकासच्या पहिल्या पत्नीने सुधीरला हाताशी धरून हत्येचा कट आखला. त्यानंतर बावली गावात गुन्हेगारी विश्वात नुकत्याच दाखल झालेल्या दोन शूटर्सना त्या महिलेने संपर्क साधला. यानंतर त्या दोन शूटर्सनी हत्येची सुपारी घेऊन गुन्हा घडवून आणला.


शेअर करा