
मागील वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसताच केंद्र सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली आणि याचा परिणाम अनेकांवर झाला. अचानक झालेल्या या लॉकडाऊनच्या घोषणेचा गरीब कामगार वर्गावर मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे कामंही बंद झाल्यानं या कामगारांना दोन वेळचं जेवण मिळणंही अवघड झालं आणि या कठीण काळात कामगारांनी पायीच आपल्या गावाची वाट धरली त्यात देखील कित्येक नागरिकांना प्राण गमवावा लागला होता . जनमत आपल्या विरोधात उभे राहू शकते याचा विचार करून दुसऱ्याच लाटेत ‘ लॉकडाऊन ‘ ची भूमिका मोदींनी बदलली.
पहिल्या लॉकडाऊनच्या भयानक स्थितीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना मदतीचं आवाहन केलं. या काळात अनेकांनी आपल्याला शक्य होईल तितकी मदत पीएम केअर फंडात दान केली. यात अहमदनगरच्या विजय पारेख यांचाही समावेश आहे. पारेख यांनी पीएम केअर फंडात थोडी थिडकी नव्हे तर तब्बल अडीच लाखाची मदत केली. मात्र आता मरणाच्या दारात उभा असलेल्या त्यांच्या आईलाच बेड मिळत नसल्यानं ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी एक भावनिक सवाल केला आहे.

विजय पारेख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ‘ मी पीएम केअर फंडमध्ये 2.51 लाख रुपयांची रक्कम जमा केली. मात्र, मरणाच्या दारात असलेल्या माझ्या आईसाठी बेड उपलब्ध झाला नाही. कृपया मला मार्गदर्शन करा, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता मी कुठे मदत करू शकतो. जेणेकरुन मला बेड मिळेल आणि मी आणखी माणसं गमावणार नाही ‘.
पारेख यांचं हे भावनिक करणारं ट्विट सध्या चांगलच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये विजय यांनी पीएम केअर फंडमध्ये जमा केलेल्या रकमेची पावतीदेखील शेअर केली आहे. देशावर संकट आलं तेव्हा पारेख यांनी आपल्यापरीनं या संकटकाळात देशाला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, जेव्हा आपली माणसं मरणाच्या दारात उभा असताना पारेख यांना मदत मिळाली नाही, तेव्हा ते हतबल झाले. पारेख यांच्या या ट्विटला अवघ्या काही तासांतच भरपूर लाईक्स आणि रिट्विट मिळाले आहेत. विजय पारेख यांच्या ट्विटर अकौंट वरून ते मोदींचे चांगलेच जबरी भक्त असल्याचे दिसत आहे.
मोदी मोदी करत अंधभक्ताने जीव सोडला
नरेंद्र मोदी सरकार कोरोनाचं हे संकट हाताळण्यात कमी पडत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. याचंच एक उदाहरण आग्रामधून समोर आले होते. आग्र्यामध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा काही साधासुधा स्वयंसेवक नव्हता तर ज्याला ट्विटरवर खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत होते, असा हा स्वयंसेवक होता.
इतकेच नव्हे, तर मोदींचा कट्टर चाहता असलेल्या या स्वयंसेवकाने आपल्या कारच्या मागे मोदींचा मोठा फोटो देखील लावला होता. कोरोनाग्रस्त झालेल्या या स्वयंसेवकाचं नाव अमित जयस्वाल असं होतं. कोरोनाने त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीचं आवाहन केलं होतं. मात्र, त्याचं ते आवाहन निष्फळच ठरलं. मोदींकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही आणि सरतेशेवटी त्याला आपले प्राण गमवावे लागले . सेलेब्रिटीसाठी ट्विट आणि आवाहन करणारे मोदी गरिबांसाठी कधी तत्पर होणार ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे .
कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्याच्यासाठी बेड मिळवण्यासाठी घरचे झटत होते. त्यासाठी त्यांनी थेट ट्विटरवर ट्विट करत मोदींना टॅग करत आवाहनही केलं, मात्र मोदींकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी आवाहन केलं होतं. मात्र त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. 42 वर्षीय अमितचा त्यानंतर दहाच दिवसाच मृत्यू झाला . त्यानंतर काही दिवसांतच त्याच्या आईचा प्राणदेखील कोरोनाने घेतला.
जयस्वाल यांचं कुटुंब स्वत:ला नेहमी मोदी भक्त म्हणवून घेत आलं आहे. जयस्वाल यांनी ट्विटरवर आपल्याला खुद्द नरेंद्र मोदी फॉलो करत असल्याचं त्याने ट्विटर वर अभिमानाने लिहलं होतं. त्यामुळे कोरोनाच्या या संकटामध्ये मोदी नक्कीच आपल्याला मदत करतील असा अंधविश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता. तो मोदी आणि योगींच्या विरोधातील एक शब्द देखील सहन करु शकत नव्हता. जर कुणी त्यांच्याबद्दल चकारही टीकेचा शब्द उच्चारला तर तो त्यांना मारण्याची धमकी देत असे, असं सोनू अलघ या जयस्वाल यांच्या मोठ्या बहिणीनं सांगितलं होत.
29 एप्रिल रोजी मथुरेतील नियती हॉस्पिटलमध्ये अमित यांचा मृत्यू झाला. आणि त्यादिवशी सोनू आणि तिच्या पतीने अमितच्या कारच्या मागे असणारा मोदींचा फोटो फाडून टाकला. या संतप्त दांपत्याने यावेळी म्हटलंय की, पूर्ण कुटुंबीय याबाबत नरेंद्र मोदींना कधीच माफ करणार नाहीयेत. अमितने संपूर्ण आयुष्य पंतप्रधान मोदींसाठी वाहून दिलं होतं. मात्र, मोदीने त्याच्यासाठी काय केलं? अशा पंतप्रधानाची आम्हाला गरजच काय? आम्ही हे पोस्टर फाडून कचऱ्यात फेकून दिलं आहे, असं अमितची बहिण सोनू यांच्या पतीने म्हटलं आहे