भाजप-आरएसएसची गुप्त बैठक, कोरोना नव्हे तर ‘ या ‘ गोष्टीची भाजपला चिंता ?

शेअर करा

पश्चिम बंगालमध्ये मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपने आता उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. उत्तर प्रदेशात 2022मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांमध्ये दिल्लीत गुप्त बैठक झाली. या बैठकीत यूपीच्या निवडणुकीच्या रणनीतीवर खलबतं झाल्याची चर्चा आहे .

उत्तर प्रदेशात नागरिकांचा असलेला असंतोष पाहता पुन्हा एकदा लोकांची दिशाभूल करून प्रचारात कोणते मुद्दे घ्यायचे ? यावर ही चर्चा झाल्याचे समजते. लोक कोरोनाने त्रस्त असताना केवळ निवडणूक आणि सत्ता हाच उद्देश घेऊन काम करणाऱ्या भाजपाला अशाही परिस्थितीत स्वतःच्या इमेजची चिंता लागून राहिलेली आहे .

रविवारी ही बैठक पार पडली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. या बैठकीत प्रत्येक नेत्याने आपली मतं मांडली. विशेष म्हणजे या गुप्त बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघ सरकार्यवाह दत्तात्रय होसबोले आणि राज्य संघटन मंत्री सुनील बंसल आदी उपस्थित होते. यावरून ही बैठक किती महत्त्वाची होती याचा अंदाज लागू शकेल .

या बैठकीत उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या हाहा:कारामुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा, त्याचा निवडणुकीवर होऊ शकणारा परिणाम आदींवर चर्चा झाली. तसेच निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा कशी उंचावता येईल, यावरही काय काय प्लॅन करून लोकांना भाजपकडे खेचता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

सर्व चर्चेदरम्यान कोरोना आणि त्याच्या रोकथामावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बैठकीच्या शेवटी शहा, नड्डा आणि मोदी यांच्यात चर्चा झाली. उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीतून लोकांचा भाजपवरील विश्वास उडाल्याचं दिसून आलं आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.

संघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरणाबाबत जे फिडबॅक दिलं, त्याची माहिती होसबोले यांनी बैठकीत दिली. तसेच भविष्यात भाजपची रणनीती काय असेल त्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप आणि संघ नेत्यांमध्ये अचानक झालेल्या या बैठकीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.


शेअर करा