धक्कादायक..ऑनलाईन हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा मालक निघाला बँकेतील असिस्टंट मॅनेजर : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

चित्र : प्रतीकात्मक

त्यांना कायद्याची भीती बिलकुल नव्हती. ते एकत्र आले आणि एस्कॉर्ट सर्व्हिसेसचा बिजिनेस सुरु केला. यातून उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याने त्यांनी ह्या व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग सुरु केली, स्वतःची वेबसाईट सुरु केली. वेबसाईटवर मोबाईल नंबरसहित आपल्याकडे काम करणाऱ्या महिलांचे फोटो देखील स्पेशल फोटोसेशन करून टाकले, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत ह्या रॅकेटचा पर्दाफाश करत आरोपींना गजाआड केले आहे .

पुणे शहरातील पकडले गेलेल्या ह्या सेक्स रॅकेटचा मालक तसेच मुख्य आरोपी हा एका नामांकित बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून काम करतो तर त्याचा दुसरा सहकारी हा संगणक अभियंता म्हणून काम करतो. त्यांनी वेबसाईटवर बनवून त्यावर काही महिलांचे फोटो देखील टाकले होते तसेच किती वेळासाठी किती रुपये याचा देखील उल्लेख वेबसाईटवर केला होता. त्यांच्यासोबत एक महिला साथीदार देखील होती मात्र ती सध्या फरार झाली आहे .

पुण्यातील पाषाण परिसरात एका रो हाउसमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. सुरेश प्रल्हाद रणवीर (वय ३५,रा. बाणेर, मूळ नांदेड), रो हाउस मालक नाकसेन रामदास गजघाटे (वय ५२,रा. बावधन), रविकांत बालेश्‍वर पासवान (वय ३५,रा. सूस, मूळ बिहार), दीपक जयप्रकाश शर्मा (वय ३६,रा. बालेवाडी, मूळ ओडिशा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रविकांत पासवान बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून काम करीत असून, जयप्रकाश शर्मा संगणक अभियंता आहे.

सदर आरोपींनी सुरु केलेल्या ह्या वेबसाईटवर आजही महिलांचे फोटो असून संगीता, पिऊ, अर्पिता अशा नावाने हे फोटो टाकलेले आहेत . किती वेळासाठी किती रुपये याचा देखील या वेबसाईटवर स्पष्ट उल्लेख आहे . वेबसाईटवर मोबाईल नंबर आजही आहे मात्र पत्ता दिलेला नाही .सोबतच व्हाट्सएप्पवर मेसेज करून अधिक माहिती पुरवण्याचे देखील आवाहन त्यांनी वेबसाईटवर केले होते

रो हाऊसच्या मालकास ह्या गोष्टीची कितपत माहिती होती याबद्दल अद्याप सविस्तर खुलासा झाला नसून अधिक तपास सुरु आहे. पोलिसांना या गोष्टीची माहिती गुप्तचर यंत्रणेद्वारे मिळाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून अकरा मोबाइल, चार लॅपटॉप, एक आयपॅड आणि व्यवसायासाठी वापरण्यात येणारी टाटा सफारी गाडी हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे करत आहेत.

गेल्या महिन्याभरातच पुण्यात असे काही आणखी प्रकार उघड झाले असून आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली देखील चाललेल्या अशा व्यवसायावर पुण्यात आधी कारवाई करण्यात आली आहे . धनकवडी येथील चैतन्यनगरमधील आयुर्वेदिक मसाज सेंटर वर छापा टाकून तब्बल पाच महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले होते तसेच हडपसर येथील भोसले गार्डनमधील न्यू लोटस आयुर्वेदिक पंचकर्म हे मसाज सेंटर सुरु होते. तेथे छापा घालून २ महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले होते .


शेअर करा