शरद पवार यांच्यासाठी जितेंद्र आव्हाड करणार ‘ ही ‘ महत्वाची गोष्ट

शेअर करा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. शरद पवार यांच्याप्रती त्यांची असलेली निष्ठा ही आजच्या काळातील दलबदलू नेत्यांना एक चांगली चपराक आहे. आज आषाढी एकादशीचे निमित्त साधत जितेंद्र आव्हाड हे आपल्या फेसबुक अकाऊंटवरून #साहेब_माझाविठ्ठल या नावाने एक सिरीज सुरु करत असून यात शरद पवार यांच्याविषयी पसरवलेल्या गेलेल्या गैरसमज तसेच त्यांच्या कामाविषयी आजवर माहित नसलेल्या असंख्य गोष्टही शेअर करणार आहेत .

१ जुलै पासून ते ३० जुलै पर्यंत पर्यंत म्हणजे तब्बल एक महिना रोज संध्याकाळी ६ वाजता ह्या पोस्ट जितेंद्र आव्हाड शेअर करणार असून त्या टेक्स्ट, व्हिडीओ किंवा ऑडिओ कशा स्वरूपात राहतील याचा उल्लेख आव्हाड यांनी पोस्टमध्ये केलेला नाही.

आपल्या फेसबुक पोस्टवर जितेंद्र आव्हाड म्हणतात , ” साहेबांबद्दल समज गैरसमज खूप पसरवले गेले.स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केले.मागच्या 50 वर्षात जे प्रचंड काम साहेबांनी या देशासाठी,राज्यासाठी,राज्यातील महिलांसाठी केले आहे,ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.सोबतच साहेबांनी देखील केलेल्या कामाचं कधी मार्केटिंग केलं नाही.आजच्या अंबाणीच्या सेल्समनसारखा काहीच न करता नुसती जाहिरातबाजी साहेबांनी केली नाही.साहेब ज्या ठिकाणी होते तिथे त्यांनी आपलं काम,आपलं कर्तव्य आणि देशसेवा समजून केलं होत आणि करत आहेत.. ! थोडस जाणून घेऊयात आपण त्यांच्याविषयी आणि त्यांच्या अवाढव्य कामाविषयी..! आजपासून 1 महिना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती देत राहू.जमली तर नक्की वाचा.टीका तर नेहमीच करता आपण.यावेळी त्यांना थोडं जाणून घ्या.तुमच्या मतात नक्की फरक पडेल हा विश्वास आहे..! #साहेब_माझाविठ्ठल 1 जुलै ते 30 जुलै 2020 रोज संध्याकाळी 6 वाजता. “

1 जुलै ते 30 जुलै 2020 पर्यंत राष्ट्रवादीच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी असणार असून शरद पवार यांच्या कामाविषयी तसेच त्यांच्या विषयीच्या असंख्य गोष्टी जितेंद्र आव्हाड लोकांपुढे मांडणार आहेत .


शेअर करा