निलेश लंके कथित ऑडिओ क्लिप प्रकरण,मनसे पदाधिकाऱ्याचे काय आहे म्हणणे ? : पहा व्हिडीओ

शेअर करा

पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. यानंतर मनसैनिक पवार खचल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ जारी करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय. “तुमचा मनसैनिक पूर्णपणे खचलाय. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढेही झुकणार नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. आता याला तुम्हीच उत्तर द्या,” अशी मागणी अविनाश पवार यांनी केलीय. तसेच मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाल्यास त्याला आमदार निलेश लंके जबाबदार असतील, असाही इशारा त्यांनी दिला आहे .

अब्रुनुकसानीची 1 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी थेट आमदार निलेश लंके यांच्यावर फोन करुन त्यांना आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. तसेच राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. त्यामुळे आता अहमदनगरच्या या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या स्तरावर उमटण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे निलेश लंके यांनी हा दावा फेटाळला असून ही क्लिप खोटी असून बदनामीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे .

आपल्यावरील आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. 11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला.”

“पारनेरचे तहसिलदार नोटीस काढतात, पोलीस नोटीस देतात. त्यांच्याकडे चकरा मारत सहन करत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देण्यात आल्या. आता मला वकिलांमार्फत नोटीस देत 15 दिवसात 1 कोटी 5 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आलीय. तसं नाही केलं तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.

अविनाश पवार म्हणाले, “माझी चूक काय आहे. त्यांनी मला आईवरुन शिव्या दिल्या, माझ्या पक्षाला भंगार म्हणाले. चुका यांनी करायच्या आणि पैसे माझ्याकडे मागायचे. मी त्याच मतदारसंघातील माणूस आहे. आमदारांना हजार लोक मानत असतील तर मला 10-20 तर मानत असतील की नाही. या आमदाराला मनसैनिकांनीच मतदान केलंय. त्याच मनसैनिकांबद्दल हे असं वागत असतील तर हे आमदारांना शोभतं का? माझा आता कुणावरच विश्वास राहिला नाही. सुपा पोलीस स्टेशन, पारनेर पोलीस आणि तहसीलदार यांना मी लेखी निवेदन दिलंय. त्यांनी माझी कोणतीही चौकशी केली नाही.”

“आमदार निलेश लंकेंपासून मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. उद्या माझं काही बरंवाईट झालं तर याला हाच व्यक्ती जबाबदार राहिल. हेच आमदार चुका करुन माझी बदनामी करत आहेत. माझी राज साहेबांना विनंती आहे. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढे झुकणारा नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. मी पूर्ण खचलेलो आहे, आता याला उत्तर तुम्हीच द्या. माझे आई वडील वयस्कर आहेत. त्यांना टेंशन घेऊन काही झालं, तर याला पूर्णपणे निलेश लंके जबाबदार असतील. माझी कळकळीची विनंती आहे. निलेश लंके यांचे कोविड सेंटर प्रशासनाने ताब्यात घ्यावं ” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.

निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, “पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.”

काय आहे प्रकरण ?

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. अविनाश पवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून ही क्लिप सोशल मीडियावर फिरत होती .

आमदार निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना दिलेल्या नोटीसमध्ये 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलाय. या 15 दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला आहे .लंके यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर मनसेला राज ठाकरे आठवले असून त्यांनी ह्या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, “पारनेरचे लोकप्रतिनिदी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.”

अब्रुनुकसानीची 1 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. तसेच आमदार निलेश लंके यांनीच फोन करुन मला आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.निलेश लंके यांचे कोविड सेंटर प्रशासनाने ताब्यात घ्यावं , अशी देखील मागणी अविनाश पवार यांनी केली आहे .


शेअर करा