नवरीने मध्यरात्री प्रियकराला सासरच्या घरी बोलावले आणि त्यानंतर …

शेअर करा

गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशमध्ये अनेक धक्कादायक घटना घडत असून लग्नामध्ये फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमधील तुर्कमानपुरमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. लग्नानंतर नवरीच्या तिच्या आधीच्या प्रियकराला घरी बोलावले खरे मात्र त्यानंतर दागिने घेऊन ती पसार झाली .

लग्नाला एक महिना देखील झाला नसताना नवरी तिच्या प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना समोर आली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने प्रियकराला बोलवून १५ लाखांचे दागिने घेऊन फरार झाल्याची तक्रार पोलीस स्थानकांत नोंदविण्यात आली आहे. संबंधित महिला फरार झाल्याचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस याबाबत चौकशी करत आहे.

मनीष कुशवाहा नावाच्या मुलाचे २७ एप्रिलला संबंधित महिलेसोबत लग्न झाले होते. तसेच महिला चार दिवसांसाठी माहेरी देखील गेली होती. माहेरुन पुन्हा सासरी आल्यानंतर ती बहुतेक पूर्ण प्लॅन करूनच आली होती .संबंधित महिला तिच्या प्रियकराला फोन करुन २७ मे रोजी रात्री सासराच्या घरुन काही दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली. सकाळी जेव्हा तिच्या पतीने घरात पाहिले तेव्हा महिला गायब होती. त्यानंतर त्यांला घरातील दागिने देखील नसल्याचे दिसले. त्यांनी लगेच याबाबत स्थानिक पोलीसांना फोन करुन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलीसांनी कॅमेऱ्यात व्हिडिओ बघितला असता संबंधित महिला एका मुलासोबत पळून गेल्याचे दिसून आले.

‘ सेम वाहिनीसारख्या दिसणाऱ्या मुलीच्या लग्नाला ये ‘ : महाराष्ट्रातील प्रकार

लग्न लावण्याच्या बहाण्याने नवरा मुलाकडच्या मंडळीना गंडा घालून फसवणाऱ्या सोनू उर्फ पूजा शिंदे टोळीला नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. मंदाणा येथील युवकासोबत लग्न करुन आठच दिवसांच्या आत ही नवरी धुळे जिल्ह्यातल्या बेटावद येथे दुसऱ्याशी लगीन थाटत असतानाच पोलिसांनी सापळा रचून या संपूर्ण टोळीला अटक केली आहे. मॅरेज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला असून आरोपी अटकेत आहेत.

मुळ हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सोनू उर्फ पुजा शिंदे हिचा विवाह नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मंदाणे गावच्या एका युवकासोबत झाला होता. औरंगबादच्या एका दलालामार्फत मंदाण्याच्या नवरा मुलाकडच्या मंडळींनी 1 लाख 30 हजारांची रक्कम नवरी सोनू उर्फ पुजा शिंदे हिच्या परिवारास दिली होती.05 मे रोजी यांच्या विवाह झाला आणि दहाच दिवसांच्या आत म्हणजे 15 मे रोजी ही नवरी मुलगी पहाटे घरातील रोकड व दागिने घेवून पसार झाली.

मंदाणे येथील भुषण सैदाणे याने मंदाणे येथे याबाबत फिर्याद दिली होती. दोन दिवसांपूर्वी भुषणला धुळे जिल्ह्यातल्या बेटावद येथील नातलगाचा फोन आला. त्यात त्याने सेम तुझ्या बायको सारख्या दिसणाऱ्या एका युवतीचा बेटावद येथील कपिलेश्वर मंदीरावर लग्न सोहळा सुरु असल्याचे सांगितले . त्यानंतर संबधित घटनेची पोलिसात तक्रार देण्यात आली.

पोलिसांनी बेटावद येथे जावून तपास केला असता नुकताच लग्न झालेली मंडळी पळावद गावात लग्नात स्नेह भोजनाचा आनंद घेत होते. या माहितीवरुन पोलिसांनी या ठिकाणी जावून सोनू उर्फ पुजा शिंदे, तिची आई वंदना राजू शिंदे, रवींद्र गवबा गोपाळ, योगेश संजय साठे, विक्की राजेश कांबळे या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. विवाह करण्यास इच्छुक असे युवक हेरून त्यांना ही टोळी गंडा घालत होती .

सोनू उर्फ पुजा शिंदे या युवतीने बेटावद येथूनही लग्नासाठी 50 हजार घेतल्याच समोर आले आहे. या सोनू उर्फ पुजा शिंदेच्या टोळीची चौकशी केली असता अशा प्रकारे 13 लग्न करुन नवरदेवाकडच्या मंडळींना गंडवल्याचे समोर आले आहे. लग्न जुळवून देणाऱ्या इसमांसोबतच या टिमचे अन्य 02 सदस्य असे आणखीन तीन जण फरार असून शहादा पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहे.


शेअर करा