
नगर जिल्ह्यातील सध्या असलेले कडक निर्बंध पुढील आदेशापर्यंत ‘ जैसे थे ‘ ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत. नगर शहरात बंद असलेली किराणा दुकाने भाजीपाला तसेच दूध विक्रीला सकाळी सात ते अकरा या वेळेतच परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी महापालिका व ग्रामीण क्षेत्रासाठी एकच आदेश जारी केलेला असून सदर निर्बंध कधी पर्यंत असतील त्याची तारीख नमूद करण्यात आलेली नाही.
राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत सोमवारी शासकीय अधिकाऱ्यांसोबत व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी ग्रामीण क्षेत्र आणि महापालिका क्षेत्र असा एकच घटक घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात एकच नियमावली राहणार आहे .
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्के पेक्षा कमी असला तरी ऑक्सीजन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्या ही 40% च्या पुढे आहे त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करू नयेत यावर सर्वांचे एकमत झाले, त्यामुळे सदर निर्बंध जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवांना ग्रामीण क्षेत्रात सकाळी सात ते अकरा परवानगी होती मात्र महापालिका क्षेत्रात यावर निर्बंध होते तेवढेच निर्बंध फक्त शिथिल करण्यात आलेले आहेत.
सकाळी सात ते अकरा काय सुरू ?
किरकोळ किराणा दुकाने, दूध तसेच दूधजन्य पदार्थ , भाजीपाला विक्री फक्त ग्राहकांच्या दरवाजापर्यंत (बाजार नव्हे ), फळे विक्री, कृषी उत्पन्न बाजार समिती, अंडी मटण चिकन मच्छी विक्री, कृषी संबंधित सर्व दुकाने, पशुखाद्य विक्री, पेट्रोल पंप, हॉटेल रेस्टॉरंट बार फक्त होम डिलिव्हरीसाठी, दारूचे द्वार वितरण, सरकारी कार्यालयात 15 टक्के उपस्थिती, दूध संकलन व वाहतूक यांना पूर्ण परवानगी
पूर्णपणे बंद राहणाऱ्या सेवा कोणत्या ?
धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, दारूचे दुकाने, खाजगी कार्यालय, कटिंग सलून दुकाने, शैक्षणिक संस्था, शिकवणी, विवाह समारंभ, चहाची टपरी, दुकाने, सिनेमा सभागृह, सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, व्यायाम शाळा , मॉर्निंग वॉक, बेकरी, मिठाई दुकाने, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने