तक्रार दाखल कारण्यासाठी आलेल्या महिलेसमोर अधिकारी करत होता ‘ नको ‘ते : कुठे घडली घटना ?

शेअर करा

पोलीस म्हटल्यावर एक आधार वाटतो अशी सामान्य माणसांच्या नजरेत पोलिसांची प्रतिमा असते .मात्र तांदळात जसे खडे असावेत तसे पोलिसात देखील काही विचित्र प्रवृत्ती आहेत . तक्रारदार महिला तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनला पोहचली मात्र तिथे जे घडले ते अत्यंत लज्जास्पद होते . उत्तर प्रदेशातील देवरिया येथील भटनी पोलीस ठाण्यात घडलेल्या ह्या घटनेने उत्तर प्रदेश पोलीस दलाची मन लाजेने खाली गेली आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोर पोलीस अधिकाऱ्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भटनी पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे .

पोलीस ठाण्याचे स्टेशन ऑफिसर भीष्मपाल सिंग यादव याच्याकडे एक महिला तक्रार नोंदवण्यासाठी आली. त्याचदरम्यान अधिकाऱ्याने या महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. मात्र त्याला जाणीव नव्हती की आपला हा प्रताप सदर महिला मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत आहे. महिलेने हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. उत्तर प्रदेशातील पोलिसांवर अशा प्रकारचे आरोप याआधी झालेले आहेत .

हा व्हिडीओ व्हायरल होताच भीष्मपाल सिंग यादव हा जिल्हा सोडून पळून गेला होता . त्यानंतर पोलिसांनी त्याच्याबद्दल माहिती देणार्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले तसेच आजू बाजुंच्या पोलीस ठाण्यांना देखील अलर्ट केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला काही वेळातच अटक केली. पीडित महिला ही तिच्या जमिनीशी संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती असे समजते .


शेअर करा