‘ तुझ्या पत्नीचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल ‘, शेवटी पतीचा हा निर्णय

शेअर करा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर झोपलेल्या चुलत भावजयीवर दिराने जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. यात पीडितेला घराच्या बाजूला ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.या प्रकरणी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरु आहे .

उपलब्ध माहितीनुसार, घराच्या बाहेर झोपलेल्या 25 वर्षीय चुलत भावजयीला घराच्या बाजूला ओढत नेत जबरदस्तीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला तसंच या बाबत कुठे वाच्यता केली किंवा सांगितले तर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच तुझा व्हीडिओ माझ्याकडे आहे. जर कोणाला सांगितलं तर व्हिडीओ गावभर पाठवले जातील, अशा धमक्या देत वारंवार बलात्कार करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

29 मे रोजी देखील पीडितवर अतिप्रसंग केला. मागील दीड महिन्यांपासून हा दीर पीडित विवाहित चुलत भावजयीवर वारंवार बलात्कार करीत होता. पीडितेला हा प्रकार सहन न झाल्यामुळे तिने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. पीडित महिलेच्या पतीने त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच तुझ्या पत्नीचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल, असेही आरोपी म्हणाला.

आरोपीच्या धमकीने घाबरलेल्या पती-पत्नीने थेट केज पोलीस स्टेशन गाठले. पीडित विवाहितेच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध गु.र.नं. २७१/२०२१ भा.दं.वि. ३७६ (२)(एफ), ३७६ (२) (एन), ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अदयाप आरोपींला अटक केली नाही.सदर घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली असून घरामध्ये गावात मुलगी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे .


शेअर करा