दोन्ही बायकांसोबत डान्स करणारे टिकटॉक स्टार दिनेश पवार यांच सध्या काय चाललंय ?

शेअर करा

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने चीनला मुंहतोड जवाब असा दावा करत चीनच्या ऐपवर बंदी घातली . चीनवर याचा फारसा परिणाम झाला नाही मात्र भारतातील टिकटॉक स्टारच्या मात्र उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. अशाच महाराष्ट्रातील धुळे येथील एका टिकटॉक स्टारच्या दोन्ही बायकांना टिकटॉकवर बंदीचे वृत्त कळताच अश्रू आवरले नाहीत.

धुळे येथील दिनेश पवार असं या टिकटॉक स्टारचे नाव असून आपल्या दोन्ही बायकांसोबत ९०च्या दशकातील गाण्यांवर डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ शूट करून टिकटॉकवर अपलोड केले. त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आणि त्याचा मोठा फॅन बेस तयार झाला . नव्वदीच्या काळातील मस्त बॉलीवूड गाण्यांवर दिनेश हे आपले व्हिडीओ बायकांना सोबत घेऊन डान्स करून अपलोड करत असतं . आता टिकटॉक बंद झाल्याच्या वृत्ताने त्यांच्या दोन्ही बायकांना देखील रडू कोसळले आहे .

कधी शेतात, कधी रस्त्यावर तर कधी घरामध्ये डान्स करतानाचे त्यांचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होते .डान्सचं कोणतंही प्रशिक्षण न घेता सिनेमातील हिरोंप्रमाणे हुबेहुब करण्यात आलेला डान्स टिकटॉक प्रेमींना खूप आवडला होता आणि यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धीही मिळाली.

टिकटॉकवर बंदीचे वृत्त येताच दिनेश पवार आणि त्याचे कुटुंबीयांमध्ये प्रचंड निराशा पसरली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो, केवळ आम्हीच त्यामुळे उद्ध्वस्त झालेलो नाहीत, तर इतरांनाही त्याचा फटका बसलेला आहे. हे आम्ही जाणून आहोत. पण या निर्णयानंतर माझ्या दोन्ही पत्नींना राहवलं नाही. त्या ढसाढसा रडल्या, असं दिनेश पवार म्हणाले.

टिकटॉक बंद झालं असलं तरी दिनेश पवार यांनी त्यावरही नवा पर्याय शोधला आहे. टिकटॉक बंद झाल्याने आमच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी आता आम्ही लवकरच युट्यूबवर येण्याचा देखील त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी प्रॉमिस केले आहे. मात्र युट्युबवर कॉपीराईट आणि कन्टेन्ट बनवण्यासाठी घ्यावी लागत असलेली मेहनत पाहता किती टिकटॉकर यशस्वी होतील हे येत्या काळात पाहावे लागेल.


शेअर करा