पुण्यातून चिमुरडीचे अपहरण केले खरे मात्र ‘ असा ‘ उधळला डाव

शेअर करा

कोरोनाची लाट ओसरत असली तर दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढलेले दिसत आहे . अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आलेली आहे . एका चार वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर आरोपी तरुण संबंधित मुलीला विकण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन चालला होता. त्यावेळी संशय आल्याने एका तरुणाने याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी तरुणाला या तरुणाने बातचीत करण्यात गुंतवलं. त्यामुळे सासवड पोलिसांना संबंधित 4 वर्षाच्या चिमुकलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करणं शक्य झालं आहे. मुलगी सुखरूप आपल्या घरी पोहचली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 वर्षाची पीडित मुलगी गुरूवारी रात्री पुण्यातील स्वारगेट बस स्टॅंड परिसरात आपल्या आईसोबत झोपली होती. यावेळी आरोपी रात्रीचा फायदा घेऊन या मुलीचं अपहरण केलं. पीडित मुलीच्या आईला रात्री एक वाजता जेव्हा जाग आली. त्यावेळी तिची मुलगी बेपत्ता असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. यानंतर पीडितेच्या आई वडिलांनी तातडीने स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, अपहरण झालेल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला.

दुसऱ्या बाजूला सासवड येथील रहिवासी असणारा अमित शिंदे नावाचा तरुण आपली रात्रपाळी संपवून घरी चालला होता. त्यावेळी सासवड पीएमटी बसस्थानकावर त्याला एक तरुण एका लहान मुलीसोबत आढळला. संबंधित मुलीचा तपशील सोशल मीडियावर पोलिसांनी व्हायरल केलेल्या पोस्टशी मिळता जुळता असल्याच त्याच्या निदर्शनास आलं. यावेळी पाऊस पडत असल्याने अमित शिंदे तातडीने घरी गेले आणि चारचाकी घेऊन पुन्हा घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुणाला बोलण्यात गुंतवून ठेवलं. शिंदे याआधी आधीच पोलिसांना कळवले असल्याने पोलिसांनी तातडीने पावलं उचलत घटनास्थळी दाखल होतं आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित अपहरणकर्त्या युवकाचं नाव विलास कांबळे असून तो मुळचा परभणी येथील रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आला होता. पुण्यात कात्रज याठिकाणी तो आपल्या काही मित्रांसोबत राहात होता. पुण्यात आल्यानंतर त्याला काम न मिळाल्याने त्याने पीडित मुलीचं अपहरण करण्याच ठरवलं. आरोपी पीडित मुलीला दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन 15 हजार रुपयांत विकणार होता. आरोपीला सध्या स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून आरोपीची चौकशी केली जात आहे.


शेअर करा