विवाहबाह्य संबंधासाठी पतीची हत्या करून रचला ‘ असा ‘ बनाव मात्र इथं चुकलं अन ..

शेअर करा

पतीची हत्या करण्याचा पत्नीने फुल प्रूफ प्लॅन बनवला होता मात्र असा बनाव रचणाऱ्या पत्नीचा दिल्ली पोलिसांनी भांडाफोड केला आहे . महिलेने प्रियकराच्या साथीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलं आणि मोलकरीण घरात असताना त्यांच्या नकळत महिलेने पतीची हत्या केली. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून प्रियकर मात्र पसार झाला आहे.

दिल्ली पोलिसांना निहारमधील निलोठी एक्स्टेंशन भागात 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याचं 3 मे रोजी समजलं होतं. अनिल साहू नावाच्या तरुणाची राहत्या घरी हत्या झाली होती. गुंडांनी आपल्या पतीची हत्या केल्याचा बनाव त्याची पत्नी भुवनेश्वरी देवी उर्फ पिंकीने रचला होता. पोलिसांनी पिंकीची अनेक तास कसून चौकशी केली तेव्हा त्यांचा महिलेवरील संशय बळावला आणि तिच्या विवाहबाह्य संबंधाची देखील पोलिसांना खबर होतीच. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने हत्येची कबुली दिली.

झारखंडमधील धनवारमध्ये असलेल्या मालमत्तेच्या वादातून पतीची हत्या केल्याचं पिंकीने सांगितलं. यावरुन दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. हत्येच्या वेळी दोन अल्पवयीन मुलं आणि दोन मोलकरणी माया आणि ज्योतीही घरात होत्या, असं पिंकीने सांगितलं. दिल्लीत राहणाऱ्या मयत अनिल साहूचे अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध होते, असा दावा पिंकीने केला आहे तर पिंकीचे देखील दुसरीकडे राज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अनिलने आक्षेप घेतल्यामुळे पिंकीने पतीचा काटा काढण्याचा कट प्रियकराच्या साथीने रचला. या गोष्टीवरून त्यांच्यात आधीही वाद झाले होते.

असा रचला होता प्लॅन ?

दोन जूनच्या रात्री अनिल साहू घरी आला, तेव्हा पिंकीने त्याला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिने राजला घरी बोलावलं. दोघांनी मिळून अनिलचे हातपाय दोरखंडाने बांधले. दोघंही त्याचा जीव घेण्याच्या तयारीत असताना अनिल शुद्धीवर आला. त्यावेळी राज आणि अनिल यांच्यात मारामारी झाली. मात्र पिंकीने आपल्या नवऱ्याला पकडलं आणि राजने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. हत्येनंतर प्रियकर राजने घटनास्थळावरुन पोबारा केला, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीने गुंडांनी घरात घुसून पतीची हत्या केल्याचा बनाव रचला. राजच्या शोधासाठी पोलिसांची छापेमारी सुरु आहे.


शेअर करा