नगर हादरले..अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या मुलीची आत्महत्या, आरोपीचा शोध सुरु

शेअर करा

अत्याचाराची बळी ठरलेल्या सतरा वर्षीय युवतीने मानसिक त्रासातून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. नगर शहरातील एका उपनगरात 4 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली होती.

याप्रकरणी मयत युवतीच्या आईने सात जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी याने काही दिवसांपूर्वी मयत युवती सोबत शारीरिक संबंध ठेवले त्यातून मयत मुलगी ती गर्भवती राहिली मुलगी गर्भवती राहिल्याचे समजताच आरोपीने तिला त्रास देणे सुरू केले.

आरोपीचा त्रास असह्य झाल्यानंतर होत असलेल्या मानसिक त्रासातून सदर मुलीने 4 जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजता राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी . मुंडे हे पुढील तपास करत आहेत . गुन्ह्यातील आरोपीचे नाव अद्याप समोर आलेले नाही मात्र पोलिसांचा तपास सुरू आहे.


शेअर करा