मोदींची यापुढील राजकारणाची दिशा अडवाणींच्या मार्गावर , संघाकडून ‘ मोठा ‘ निर्णय

शेअर करा

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. कोरोना काळात परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आणि भाजप शासित राज्याला आलेले अपयश हे सर्वानाच माहित आहे. मोदी यांच्या नावाने मते मिळण्याचे दिवस देखील संपल्याचे संघाला लक्षात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये मोदींना पुढे करून काही फायदा झाला नाही . काहीही करून निवडणूक तर जिंकणे तर भाग आहे त्यामुळे येत्या पाच राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे .

उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंदेखील लक्ष घातलं आहे. उत्तर प्रदेशात मोदी आणि योगी यांच्यात शीतयुद्ध सुरु असून ‘ सब चंगा सी’ चे दिवस राहिलेले नाहीत. योगी आदित्यनाथ यांचे पंख कापण्याचे केंद्राकडून प्रयत्न होत आहेत मात्र योगी आदित्यनाथ त्याला जुमानत नसल्याचे देखील उघड आहे .

मोदींच्या नावाने अपयशच पदरी येते त्यामुळे उत्तर प्रदेशची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या संघाच्या बैठकीत झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसोबत निवडणूक होत असलेल्या इतर राज्यांमध्येही भाजप मोदींचा चेहरा वापरला जाणार नाही. दैनिक भास्करनं याबद्दलचं वृत्त दिलं असून मोदींचा यापुढील कार्यकाळ अडवाणी यांच्या मार्गाने जाण्याची चिन्हे जास्त आहेत .

प्रादेशिक नेत्यांच्या विरोधात पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे केल्यानं त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे सांगून संघाकडून मोदींची इमेज वाचवण्याचा प्रयत्न होत आहे . राज्याच्या निवडणुकीत प्रादेशिक नेते वि. मोदी असं चित्र उभं केल्यानं विरोधकांकडून मोदींना विनाकारण लक्ष्य केलं जातं, त्यामुळे मोदींची इमेज डागाळत आहे, असे संघाचे म्हणणे आहे . विशेष म्हणजे भाजप उत्तर प्रदेशात यावेळी मुस्लिम उमेदवारांना देखील तिकीट देणार असल्याची माहिती आहे , जेणेकरून पक्षाची मुस्लिम विरोधी प्रतिमा तयार होणार नाही.

उत्तर प्रदेशातही बंगालप्रमाणेच मुस्लिमांचं प्रमाण लक्षणीय आहे. विधानसभेच्या ७५ जागांवर मुस्लिम मतदार थेट परिणाम करू शकतात. उत्तर प्रदेशात भाजपनं मोदींचा चेहरा वापरल्यास काँग्रेस आणि समाजवादी पक्ष बंगालमधील राजकारणाची पुनरावृत्ती करतील, असा धोका संघाला वाटत असल्याची देखील चर्चा आहे मात्र खाजगीत बोलताना मात्र नेते मोदी यांची जादू ओसरत चालल्याचे कबुल करतात .

पश्चिम बंगालच नव्हे तर याआधी बिहार आणि दिल्लीतही भाजपनं मोदींच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या. २०१५ मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधात आणि दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवालांविरोधात भाजपनं मोदींचा चेहरा वापरला मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपला नुकसान सोसावं लागलं तर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसनं मोदींची मुस्लिमविरोधी प्रतिमा तयार केली. त्यामुळे मुस्लिमांची एकगठ्ठा मतं तृणमूल काँग्रेसला मिळाली. ७० टक्क्यांहून अधिक मुस्लिमांनी तृणमूलला मतदान केलं, अशी माहिती संघाकडे आहे.

महाराष्ट्रात देखील शिवसेनेसोबत विधानसभा निवडणूक लढवली मात्र शेवटी शिवसेनेनं प्रादेशिक पक्षाची मोट बांधत सत्तेतून भाजपाला बाहेर केले. राज्याची अस्मिता ही मोदींच्या नेतृत्वावर भारी पडत असून राज्यातील भाजप नेत्यांनाच पुढे आणण्याचा संघाचा मानस असल्याचे सूत्रांकडून समजते मात्र योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपलेच नेते पुढे भाजपलाच डोईजड होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजप आणि संघ जपून पावले टाकत आहे .


शेअर करा