डॉक्टर तुम्हीसुद्धा ? रात्री ११ ला मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्यानंतर …

  • by

काही दिवसांपूर्वी सातारा इथे एका डॉक्टरला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती तशाच स्वरूपाची घटना आता दिल्ली इथे घडली असून डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते. दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मात्र असल्या मोहापायी डॉक्टरांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, ‘ रात्री ११ च्या सुमारास या डॉक्टरच्या फेसबूकवर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. डॉक्टरांनी ती एक्सेप्ट केली मग समोरील मुलीच्या अकाऊंटवरून व्हॉट्सअ‍ॅप नंबरची मागणी केली गेली. दोघांमध्ये गप्पांना सुरुवात झाली. मग समोरील मुलीकडून सेक्सी व्हिडीओ कॉलचे आमिष दाखवले गेले. त्या मुलीने व्हिडीओ कॉल करून न्यूड होण्यास सुरुवात केली. मग डॉक्टरही न्यूड झाले. त्यानंतर मात्र त्वरित कॉल कट झाला. त्यानंतर डॉक्टरांचे तसले न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन डॉक्टरकडून पैसे वसूल केले गेले. मात्र हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार थांबला नाही तर वाढतच राहिला त्यानंतर मात्र डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

दिल्लीतील या डॉक्टराने पोलिसांना सांगितले की, ते एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत. सध्या ते भाड्याच्या घरात राहत आहेत. मे महिन्यात त्यांना फेसबूकवर एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. या मुलीने व्हॉट्सअॅप नंबरची मागणी केली. मग १२ मे रोजी तिला या डॉक्टरांनी व्हॉट्सअॅप नंबर दिला. मग या मुलीने व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी पहिल्यांदा डॉक्टरांनी नकार दिला. मात्र पुन्हा असाच आग्रह झाल्यावर डॉक्टर तयार झाले. त्यावेळी मुलगी न्यूड झाली. मग डॉक्टरांनीही तसे केले. मात्र काही वेळातच त्यांना मेसेज आला की, त्यांचा न्यूड व्हिडीओ तयार झाला आहे. आता पैसे दिले नाहीत तर तुमचा व्हिडीओ व्हायरल केला जाईल.

डॉक्टरांनी घाबरून त्या नंबरवर फोन केला असता एक तरुण बोलत होता. त्याने २९ हजार रुपये न दिल्यास न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या डॉक्टरांनी पैसे पाठवले. मग गर्ल चार्जच्या नावावर १६ हजार ८०० रुपये व्हिडीओ डिलीट करण्यासाठी २६ हजार ५०० आणि धमकी देऊन २९ हजार असे मिळून ८१ हजार ३०० रुपये डॉक्टरांकडून उकळले.

ब्लॅकमेलरचे इतके पैसे उकळून देखील समाधान झाले नाही. त्यानंतर त्याने सोशल मीडिया चार्जच्या नावाने ३७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. मग मात्र डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा या ब्लॅकमेलरने व्हिडीओ फेसबूक आणि यूट्युबवर अपलोड केल्याचे स्क्रीनशॉट पाठवण्यास सुरुवात केली. त्याचा एक नंबर ब्लॉक केला असता दुसऱ्या नंबरवरून फोन करण्यास सुरुवात केली. अखेर डॉक्टरांनी हिंमत करून पोलिसांमध्ये तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

साताऱ्यात काय घडले होते ?

साताऱ्यातील एका 46 वर्षीय डॉक्टराचे भले मोठे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काही महिन्यांपूर्वी एक महिला म्हणून डॉक्टराकडे गेली होती त्यावेळी संबंधित महिलेने डॉक्टरांचा फोन नंबर घेतला. डॉक्टरांनीही प्रामाणिकपणे आपला मोबाईल नंबर त्या महिलेला दिला. भल्यामोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये कमावणारा सावज आपल्याला सापडला अशा अविर्भावात ती महिला घरी गेली.

काही दिवसांनी डॉक्टरांना सदर महिलेचे रोज मेसेज येऊ लागले सुरुवातीला त्यांनी त्या मेसेज कडे दुर्लक्ष केले मात्र काही दिवसानंतर डॉक्टरांनाही मोह आवरता आला नाही. त्यांनीही संबंधित महिलेसोबत चॅटिंग सुरू केले. हळू त्यांचे हे चॅटिंग व्हिडीओ कॉलिंगपर्यंत जाऊन पोहोचले. हळूहळू हे व्हिडीओ कॉलिंग इतके शिगेला पोहोचले की डॉक्टर यात आपले भान हरपून बसले आणि आणि कधी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले ते त्यांनाही कळले नाही.

आता खरी सुरुवात त्यांची इथून पुढे सुरू झाली. संबंधित महिला व्हिडीओ कॉलिंग करून स्वतः विवस्त्र होऊ लागली आणि त्यानंतर डॉक्टरांनाही ती तशाच स्वरूपाची गळ घालू लागली. डॉक्टरांची ही उत्कंठा स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी संबंधित महिला सांगेल त्या पद्धतीने व्हिडीओ कॉलवर नको नको ते केले पण हे कृत्य आपल्याला महागात पडेल याचा त्यांना अंदाजही नव्हता.

संबंधित महिलेने डॉक्टरांना अक्षरश: वारंवार आपल्या बोटावर नाचवले आणि डॉक्टरांकडून ‘ तसले ‘ प्रकार व्हाट्सअप कॉलिंगद्वारे करून घेतले. संबंधित महिलेने हे सर्व पुरावे आपल्याजवळ साठवून ठेवले. या पुराव्यांच्या आधारे आता आपण डॉक्टरांना ब्लॅकमेल करू आणि बक्कळ पैसा कमवू अशी स्वप्न पाहून संबंधित महिलांनी डॉक्टरांकडे तब्बल 60 लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाहीत तर हॉस्पिटल वर मोर्चा आणून पोलीस ठाण्यात तक्रार करू अशी ही धमकी डॉक्टरांना देण्यात आली.

आत्तापर्यंत जी काही इज्जत सन्मान कमावला आहे ते सर्व धुळीस मिळेल याचा विचार करून डॉक्टरांनी त्या महिलांना तब्बल बारा लाख रुपये दिले. थोड्याच दिवसात आपण कितीही पैसे दिले तरी या महिलांची पैशाची भूक कधी संपणार नाही हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे धाडस करून त्यांनी झालेला प्रकार शाहूपुरी पोलिसांसमोर कथन केला. हनी ट्रॅपमधून पैसे उकळवणाऱ्या या महिलांना अडकवण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि दोन्ही महिला या सापळ्यात अलगद अडकल्या.

दहा वर्षापासून या महिलांचे बिनबोभाट काम सुरू होते मात्र इतक्या वर्षात एकही व्यक्ती समोर न आल्याने संबंधित महिलांची हिम्मत वाढली. साताऱ्यातील एका डॉक्टरला आणि हनी ट्रॅपच्या जाळ्यात उडून त्यांनी त्याच्याकडून तब्बल 12 लाखाची खंडणी वसूल केल्यानंतर या महिलांचे बिंग बाहेर पडले. त्यांना अटक झाल्यानंतर सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कोठडीमध्ये पोलिसांनी त्यांच्याकडे तपास सुरू केला त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

या महिलेने कोथरूड परिसरातील अनेकांना अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढण्याचे समोर आले आहे. अनेकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून केवळ पैसे उकळणे हाच हेतू त्यांचा होता. ज्यांनी पैसे दिले नाहीत यांच्याविरोधात कोथरुड पोलिस ठाण्यात या महिलेने अर्जही दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र तक्रार अर्ज दिल्यानंतर परस्पर संबंधित व्यक्तीला भेटून हे अर्ज माघारी घेतले जात होते त्यामुळे या महिलेवर एकही गुन्हा दाखल झाला नाही.

एकीने हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढायचे आणि दुसरीने संबंधिताला ब्लॅक मेल करायचे अशी या दोघींची लुटालूट करण्याची पद्धत होती. त्यांच्या सोबतीला आणखी काही महिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून लवकरच यातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. आम्ही जोगतीन आहोत असेदेखील त्या म्हणायच्या मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आम्ही नणंद भावजय नव्हे हे तर मैत्रिणी आहोत अशी त्यांनी पोलिसांकडे कबुली दिली. या दोघी मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी या गावातील आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून या दोघी पुणे, सातारा व सोलापूर अशा विविध ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहत होत्या.

एका ठिकाणी येऊन काम फत्ते झाल्यानंतर त्या शहर सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्यास जात असत. या दोघेही पतीपासून विभक्त झालेल्या आहेत..या दोघींनी पेरलेल्या सावजाकडून पैसे वसूल करताना ही संबंधित मुलगी त्यांच्यासोबत जायची. त्या ठिकाणी गेल्यानंतर दंगा करून पैसे वसूल करण्यात या अल्पवयीन मुलीचा हातखंडा होता अशी ही माहिती पुढे आली होती.