समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात शुक्रवारी (१९ जून) संगमनेर कोर्टात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल करण्यात होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी शुक्रवारी आज पार पडली त्यामुळे कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांना अहमदनगरमधील संगमनेर कोर्टाने ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत
स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते..असे विधान इंदोरीकर महाराजांनी केले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी फिर्याद दिली आहे.
आता इंदोरीकर महाराजांना ७ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर रहावे लागणार असून मग जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे .इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीची नोटीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव ऍड. रंजना गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना १७ फेब्रुवारीला बजावली होती. त्यानंतर ह्या प्रकरणावर मीडियाचे लक्ष गेले आणि इंदोरीकर महाराज यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली.