बापरे.. पोलिसाच्या घरी स्वच्छतागृहात साडेसहा फुटाचा नाग

  • by

प्रातःविधीला गेल्यावर जर संडासच्या भांड्यावर नागोबा ठाण मांडून बसलेला दिसला तर काय हालत होईल, असाच अनुभव एका पोलिसाला आला आहे .नांदेड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात साडेसहा फुटांचा नाग आढळला आहे. शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास स्वच्छतागृहात हा नाग फणा काढून बसलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या नागाला फणा काढलेलं पाहून पोलिसाची देखील पळता भुई थोडी झाली.

नांदेड शहरातील एनटीसी मिलला लागून नांदेड जिल्हा कारागृह आहे. कारागृह परिसरातच अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची जुन्या पद्धतीची शासकीय निवासस्थाने आहेत. महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात हा विषारी नाग आढळला आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वॉशरुमसाठी गेलं असता, सहा फुटांचा हा नाग फणा काढून बसला होता. या सापाला परिसरात एकच घाबरगुंडी उडाली .

स्वच्छतागृहात नाग आढळल्यानंतर पठाण यांनी त्वरित सर्पमित्र भोसले यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर रात्री उशीरा नागाला सुरक्षित बाहेर काढलं आहे. त्यानंतर पठाण कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सर्पमित्र भोसले यांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन नागाला सोडून दिलं आहे. वेळीच सतर्क झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर परिसरात बराच वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र या घटनेनंतर पोलिसांना देखील राहण्याची घरे काय दर्जाची असतात हे देखील या निमित्ताने स्पष्ट झाले आहे .