लग्नात मिळालं ‘ असं ‘ गिफ्ट, नवरी झाली लाजेनं चूर तर नवरदेव …

  • by

लग्नामध्ये कोण काय गिफ्ट देईल सांगू शकत नाही. याआधी अशा विचित्र गिफ्टचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. महागाईच्या काळात कुणी कांदे-बटाटे दिली, कुणी भाजीपाला दिला. तर मजा म्हणून कुणी बाळाची दुधाची बाटली, लहान मुलांची खेळणी, पाळणा असं काहीतरी दिलं. पण सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नातील विचित्र गिफ्टचा व्हिडीओ व्हायरल होत असून नवरीने देखील ते गिफ्ट पाहिल्यावर ती लाजून चूर झाली आहे .

official_niranjanm87 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता वर आणि वधू स्टेजवर खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचा मित्र परिवार आहे. नवरीच्या हातात एक गिफ्ट दिलेलं आहे. तिथं स्टेजवरच ते गिफ्ट तिला खोलायला लावतात. एक लांब असा बॉक्स आहे. सर्व मंगलमयी अशा वातावरणात नवरदेव तो बॉक्स तिला उघडून दाखवतो.

नवरी जेव्हा त्या बॉक्मसधील गिफ्ट बाहेर काढते, तेव्हा ती हैराणच होते. लाजेनं गुलाबी झालेली सुद्धा दिसते. गिफ्ट म्हणून तिला एक लाटणं आणि चिमटा मिळालेला असतो. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला हे असं गिफ्ट मिळण्यामागील कारण तर समजलंच असेल. आता या मित्रांनी नववधूला हे गिफ्ट स्वयंपाक घरात वापरण्यासाठी दिलं आहे की नवऱ्याची धुलाई करण्यासाठी ? याच्या पाठीमागील उद्देश मात्र समजलेला नाही .

साहजिकच नववधूच्या हातात हे असं गिफ्ट पाहून नवऱ्याची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही तुम्हाला आली असेल तरी आपलं लग्न म्हणून चेहऱ्यावर हसू आणताना दिसत आहे. गिफ्ट पाहून नवरा-नवरीची अवस्था काहीही झालेली असूदे. पण तुम्हाला मात्र नक्कीच मजा आली असेल. तुम्ही तर पोट धरून हसला असाल. कदाचित तुम्हालाही एखाद्याच्या लग्नात काहीतरी हटके गिफ्ट देण्याची आयडिया या निमित्ताने मिळाली असेल.