नाशिकमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागलं स्टील आणि लोखंड , पहा फोटोज

  • by

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोनावरील लस पण हीच लस घेऊन तुमच्या शरीरात समजा चुंबकत्व निर्माण झाले आणि शरीराला सर्व वस्तू अचानक चिटकायला सुरूवात झाली तर….बसला ना आश्यर्याचा धक्का…होय..हे खरं आहे. नाशिकच्या सिडको परिसरात शिवाजी चौकात राहणारे 71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या सोबत हा प्रकार घडला असून याची नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे .

उपलब्ध माहितीनुसार, नाशिकच्या सिडको भागातला हा प्रकार घडला असून अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सकाळने जागेवर जाऊन भेट दिली आणि यात काही फसवेगिरी नाही ना याचा शोधही घेतला. कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. असे सोनार यांनी सांगितले. माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून दाखवल्या.

दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यानंतर लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होते असे समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला. तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले. या संदर्भात तपासणी करूनच प्रतिक्रिया देऊ असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

“त्यांनी ज्या खासगी रुग्णालयात लस घेतली आहे, त्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. मात्र असा प्रकार घडल्याचा यापूर्वी कुठलाही विषय आलेला नाही” असे उमेश मराठे, लाईफ केअर हॉस्पीटल, संचालक यांनी सांगितले आहे तर अरविंद सोनार यांच्या म्हणण्यानुसार, ‘ मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे ? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे ‘ असे म्हटले आहे .

“अरविंद सोनार यांनी सरकारी दवाखान्यात पहिली लस घेतली होती. ९० दिवसांनी अपोलो रुग्णालयात त्यांनी दुसरी लस घेतली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर स्टील वगैरे वस्तू चिकटत आहेत. त्यांची तपासणी केल्यानंतर हे नेमकं कशामुळे होत आहे हे स्पष्ट होईल. आतापर्यंत साडे तीन लाखांहून जास्त लोकांना लस देण्यात आली असून इतर व्याधींमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता कमी आहे,” असं पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

“अंगाला वस्तू चिकटत असतील तर तपासणी केली पाहिजे. आतापर्यंत अनेकांना लस देण्यात आली असून एखाद्याच्या अंगाला वस्तू चिकटत असतील तर त्याचा लसीशी काही संबंध नााही. शास्त्रीयदृष्ट्या हे शक्य नाही. त्यांच्या त्वचेशी संबंधित एखादी गोष्ट असू शकते जे तपासणीनंतर स्पष्ट होईल, पण याचा आणि लसीचा काही संबंधी नाही”, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही हा चमत्कार नसून घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. हा विज्ञानाचा एक भाग असून वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असं त्यांनी सांगितलं आहे.