एकीकडे कोरोना तर दुसरीकडे ‘ असला ‘ डॉक्टर , नातेवाईकांनी कोल्हापुरात गाठले अन …

  • by

देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लागून रुग्णसेवा करत आहेत. दरम्यानच्या काळात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि महिला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. कोविड रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाच्या घटनाही समोर आल्या आहे. अशीच एक घटना कोल्हापूरातील एका शासकीय कोविड सेंटरमध्ये घडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका शासकीय कोविड सेंटरच्या प्रमुख डॉक्टरने आपल्या सहकारी महिला डॉक्टरचा छळ केला आहे. संबंधित प्रमुख डॉक्टर मागील बऱ्याच दिवसांपासून पीडित महिला डॉक्टरचा छळ करत होता. तिला मानसिक त्रास होईल, असं वर्तन डॉक्टराकडून केलं जात होतं. सतत होत असलेल्या त्रासाला वैतागून वरिष्ठ डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती पीडितेनं घरी आणि नातेवाईकांना दिली.

संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख प्रथमश्रेणी डॉक्टरला रामलिंग फाट्यावरील एका हॉटेलमध्ये गाठले आणि जबरदस्त धुलाई केली. डॉक्टरला मारण्याचे कारण समजताच गर्दीतील लोकांनीही आपला हात साफ करून घेतला . यावेळी आसपासच्या नागरिकांनी आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी बरीच गर्दी केली होती. तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याने मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं. त्यामुळे या घटनेची पोलिसांत नोंद केली नाही.

संबंधित आरोपी डॉक्टर मार्च 2020 पासून शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मागील दीड वर्षांपासून ते कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. तर पीडित महिला डॉक्टर इचलकरंजी येथील रहिवासी असून त्या संबंधित कोविड सेंटरमध्ये सहाय्यक महिला डॉक्टर म्हणून काम करत आहेत. आरोपी वरिष्ठ डॉक्टरने वारंवार पीडित महिला डॉक्टरला त्रास दिला आहे त्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी आरोपीची चांगलीच धुलाई केली आहे.