कोरोनाची दुसरी लाट ओसरताच केंद्राचे वरातीमागून घोडे, घेतला ‘ मोठा ‘ निर्णय

शेअर करा

राहुल गांधी यांच्या सल्ल्यांवर केंद्र सरकारचे सगळे मंत्री टीका करत असले तरी शेवटी त्यांचेच सल्ले उपयोगी असल्याचे केंद्राच्या लक्षात आलेले दिसत आहे . असाच एक मोठा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे मात्र हा निर्णय घेण्यास केंद्राने खुप उशीर केला असल्याची टीका केली जात आहे. कोरोनाचा देशातील प्रादुर्भाव कमी झाल्यावर ब्लॅक फंगसचे औषधे जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तर रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच व्हॅक्सिनवर आकारण्यात येणारी 5 टक्के जीएसटी कायम राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे मात्र हा निर्णय देखील फक्त 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच लागू राहणार आहे. दुसरी लाट ओसरली आणि मग हा निर्णय घेण्यात आल्याने हे एक प्रकारे वरातीमागून आलेले घोडे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये . 30 सप्टेंबर 2021 पर्यन्तचीच मर्यादा ह्या निर्णयाला असल्याने कदाचित तिसरी लाट आली तर त्यावेळी नियम वेगळे राहणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आज 44 वी जीएसटी कौन्सिल पार पडली. यावेळी कोरोना संबंधित मेडिकल इक्विपमेंट्स आणि औषधांवरील जीएसटीत कपात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आजच्या बैठकीत रेमडेसिवीरील जीएसटी दर 12 टक्क्यावरून कमी करून 5 टक्के करण्यात आला. Tocilizumab, Amphotericin B ही ब्लॅक फंगसची औषधे पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्यात आली आहेत. तसेच मेडिकल ग्रेड ऑक्सिजनसाठीचा जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.

आता बायपॅप मशीन, ऑक्सिजन कन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटरला जीएसटीचेच दर लागू राहतील. त्याशिवाय कोविड टेस्टिंग किट, हँड सॅनिटाझर, टेम्परेचर चेक इक्विपमेंट्सवरील जीएसटी कपात करून 5 टक्के करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेवरील जीएसटी दर कमी करून 12 टक्के करण्यात आला आहे. सध्या रुग्णवाहिकेवर 28 टक्के जीएसटी आकारला जातो. कोरोनाशी संबंधित ज्या साहित्यांवर सूट देण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना उद्या जारी करण्यात येणार आहे. येत्या 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ही कपात लागू राहील. त्याच दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक होणार आहे.

कोरोना व्हॅक्सिनवर आकारण्यात येणारा जीएसटी रद्द करण्याची सर्वच स्तरातून मागणी होत होती. मात्र जीएसटी परिषदेने कोरोना व्हॅक्सिनवरील 5 टक्के जीएसटी दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात कोणतंही राजकारण नाही. व्हॅक्सिनवर 5 टक्के जीएसटी आहे. त्यातील 75 टक्के लसींची खरेदी केंद्र सरकार करत आहे. मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा सामान्य जनतेला फटका बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत .


शेअर करा