बायकोसाठी हायवोल्टेज ड्रामा करत नवरा मोबाईल टॉवरवर चढला अन ती आलेली पाहिल्यावर : पहा व्हिडीओ

शेअर करा

बायको माहेरी गेली की आपली मजा असते, असे बहुतेक पुरुष म्हणतात मात्र जेव्हा ती खरंच माहेरी जाते किंवा काही दिवस त्यांच्यापासून दूर होते. तेव्हा मात्र त्यांना बिलकुल करमत नाही. मग तिला घरी आणण्यासाठी ते काय करतील याचा काही नेम नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात बायकोसाठी नवऱ्याने हायवोल्टेज ड्रामा करत मोबाईल टॉवरवरच बैठक मारून बसला.

माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी तो चक्क मोबाईल टॉवरवर चढला. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उंच मोबाईल टॉवरवर चढली आहे. ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार ही घटना राजस्थानच्या कोटामधील आहे. या व्यक्तीची बायको त्याला सोडून माहेरी गेली. पत्नी सोडून गेल्याने त्याला दुःख सहन झालं नाही. त्यामुळे तो थेट मोबाईल टॉवरवर चढला. तब्बल 3 तास त्याचा हा ड्रामा सुरू होता.

मोबाईल टॉवरवर बरेच लोक जमले. पोलीसही आले. त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो काही ऐकनाच. शेवटी पोलिसांनी त्याच्या पत्नीला माहेरून बोलावलं. त्याची पत्नी आपल्या नवऱ्याचा प्रताप समजताच धावत घटनास्थळी आली. बायको माहेरून परत आल्याचं पाहताच त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. पत्नीला भेटण्यासाठी लगेच ही व्यक्ती मोबाईल टॉवरवरून खाली उतरली. सुदैवाने त्याला कोणताही दुखापत झाली नाही.


शेअर करा