झेड सुरक्षेत घुसून भाजप नेत्याला दिली बेशरमाची फुले , कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

देशात कोरोना, रोजगार, वाढती महागाई तसेच पेट्रोल डिझेलवरून भाजपच्या विरोधात संताप वाढत आहे मात्र भाजप नेतृत्वाकडून मात्र गोलगप्पा शिवाय काही पावले उचलण्यात येत नाहीत. लोकांच्या या संतापाचा प्रत्यय भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदेयांना नुकताच आला आहे. ग्वाल्हेर येथे एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा थांबवून त्यांना बेशरमाची फुलं आणि सुताची माळ दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला तेव्हा पोलीसही केवळ मूकदर्शक होऊन पाहतच राहिले .

उपलब्ध माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, मात्र तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला आणि त्यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने बेशरमाची फुलं आणि माळ दिली. ज्योतिरादित्य यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. झेड प्रकारची सुरक्षा असलेल्या लोकांची सुरक्षा यंत्रणा सक्रिय असते मात्र या वेळी पोलीस फक्त बघतच होते. विशेष म्हणजे शिंदेंसोबत असा प्रकार त्यांच्याच शहरात घडला आहे.

खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप कार्यकर्ते समजून आपली गाडी थांबवली होती. मात्र निवेदन देणारे लोक एनएसयूआयचे कार्यकर्ते आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सुताची माळ घेतली तसेच तथाकथित निवेदनाचा कागदही घेतला. मात्र, बेशरमाची फुलं एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना परत केली. शिंदेनी सुताची माळा आपल्या सुरक्षा रक्षकांकडे दिली तर एनएसयूआयचे निवेदन आपल्या जवळच ठेवले आणि शिंदेचा ताफा एअरपोर्टकडे रवाना झाला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्यावर कोणतेही अपशब्द उच्चारले नाहीत कि त्यांचा अपमान देखील केला नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या संयमी वृत्तीची देखील सोशल मीडियावर स्तुती केली जात आहे .

ज्योतिरादित्य शिंदे सध्या आपली छबी बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. ते छोट्या-मोठ्या सर्वच नेत्यांना भेटत आहेत. एवढेच नाही तर त्यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयभान सिंह पवैया यांच्या घरीही ते पोहोचले होते. माजी मंत्री जयभान सिंह आणि सिंधिया कुटुंब 23 वर्षांचे कट्टर विरोधक आहेत. तरीही ते पवैया यांच्या घरी गेले होते. 20 एप्रिलला पवैया यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे ज्योतिरादित्य त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी बंद खोलीत हे नेते जवळपास 20 ते 25 मिनिटे भेटले होते .


शेअर करा