‘ माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करा ‘ , व्हिडीओ पोस्ट करून लातूरमध्ये तरुणीची आत्महत्या

शेअर करा

लातूरच्या एका खाजगी कॉलेजात शिकणाऱ्या एका युवतीने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वेदना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या. गळफास घेऊन स्वतःला संपवण्यापूर्वी जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत व्हिडीओ पोस्ट करुन तिने आत्महत्या केली आहे. सोनू शेख असे या युवतीचे नाव असून लातूरमध्ये या घटनेने शोककळा पसरली आहे .

लातूर शहरातल्या कॉलेजात बी.ए. च्या व्दितीय वर्षात सोनू शेख शिकत होती. सोनू शेख ही कॉलेज करत करत पार्ट टाइम जॉब देखील करायची. ‘ आता मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करते आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये, असा व्हिडीओ पोस्ट करत सोनूने राहत्या घरी आत्महत्या केलीय.

सोनू शेख व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणते ?

“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त दिवस टिकू शकत नाही… माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल”, असं ती या व्हिडीओमधून सांगत आहे.

सोनूच्या आईला कुणी तरी फोनवर बोलत होतं, त्यांच्यात भांडणही झालं होते. त्यामुळे त्याच त्रासातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला, अशी प्राथनिक माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सुसाईड नोट, मोबाईलच्या मदतीने तपास सुरु केला आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीच नव्हत. तिची आई कामावर गेली होती ,तर वडील विभक्त राहतात.


शेअर करा