लग्नाआधी सासुरवाडीत महिनाभर मुक्काम करून केला ‘ असा ‘ प्रकार की प्रकरण पोलिसात : महाराष्ट्रातील घटना

  • by

त्याची आणि तिची एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर भेट झाली होती. पुढे भेटीगाठी झाल्या आणि अखेर साखरपुडा देखील झाला.साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले मात्र काही कालावधीनंतर तो लग्नास चक्क टाळाटाळ करू लागला. अखेर ती तरुणी त्याच्या घरी पोहचली मात्र सदर तरुणाच्या आई वडील व भावाने त्या तरुणीस मारहाण केली . मुंबईतील मीरारोड येथील या घटनेनंतर त्या तरुणाच्या विरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तरुणाच्या आई,वडील व भावास सुद्धा आरोपी केले आहे .

काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली, काशीमीरा येथील एका २२ वर्षीय तरुणीचे मुंबईतील गोरेगाव इथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाशी लग्न जमले. ह्या दोघांची गाठभेट ही एका लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर झाली होती. २० फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा झाला, पण नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने लग्न लटकले त्यानंतर दोघे एकमेकांना भेटत असत मात्र अखेर लॉकडाऊन थांबण्याचे नाव घेईना त्यामुळे तो तरुण त्याच्या सासुरवाडीला राहायला आला. महिनाभर सासुरवाडीला राहायला आल्याने त्यांच्यात तिथे शारीरिक संबंध देखील तयार झाले.

महिनाभर सासुरवाडीचा पाहुणचार झोडल्यानंतर त्यानंतर तो तरुण पुन्हा त्याच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली. पुढे दोघांमध्ये वाद तयार झाले आणि अखेर त्या तरुणाने तिला लग्नास नकार दिला. मुलीच्या आईवडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही.सदर तरुणाविरुद्ध तरुणीने आता बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे .

पीडित तरुणी गोरेगाव येथे तरुणाच्या घरी त्याच्या आई वडिलांना विचारण्यास गेली असता तिला तेथे मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाचे आई, वडील व भावास देखील आरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.