जाणून घ्या संभाजीराजे यांच्या ‘ ह्या ‘ फोटोमागील सत्य

शेअर करा

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्रात दौरा करत आहे. आज अहमदनगरमधील कोपर्डीला भेट दिली. यावेळी प्रवासाच्या दरम्यान संभाजीराजेंचा साधेपणा पाहण्यास मिळाला. रस्त्याच्या बाजूला थांबून त्यांनी जेवणाचा आनंद घेतला. संभाजीराजे यांच्या प्रवासादरम्यानच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून राजेंच्या साधेपणाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे .

छत्रपती संभाजीराजे यांनी अहमदनगरमधील कोपर्डी इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यानंतर संभाजीराजे औरंगाबादच्या दिशेनं रवाना झाले. त्यावेळी जेवणासाठी संभाजीराजेंचा ताफा एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतात थांबला. संभाजीराजेंनी शेतामधील औतावर बसून जेवण केलं. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही शेतातच जेवण उरकले. शेतामधील आवतावर बसून जेवण केल्याने या साधेपणाचे जेवणाची चर्चा सर्वत्र सुरू झाली त्या दरम्यान हा फोटो काढण्यात आला आहे .

कोपर्डीत अत्याचार झालेल्या पीडित महिलेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे कोपर्डीत गेले होते. या वेळी संभाजीराजेंनी कोपर्डीच्या भगिनी यांना अभिवादन केले आणि पीडित कुटुंबाशी चर्चा केली. या वेळी आपल्याला न्याय मिळाला नाही, अशा भावना पीडित कुटुंबांनी राजे यांच्या समोर मांडल्या. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने या खटल्यासाठी विशेष बेंच स्थापन करून खटला फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडित कुटुंबातील न्याय द्यावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांच्या वंशज आहे, मी लोकांना वेठीस धरू शकत नाही मी 2007 पासून मराठा समाजाचा लढा देत आहे.मला कोणी कोणी शिकवण्याची गरज नाही..मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतील तर मी बोलेल. सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसायला लागले चांगली गोष्ट आहे. मी काय ज्योतिषी नाही शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी ज्योतिषाला मानलाच नाही तर मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असा टोलाही त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लावला आहे.


शेअर करा