महाराष्ट्रात ‘ या ‘ जिल्ह्यात पावसातून पिवळे बेडकू पडल्याची अफवा , पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात…

शेअर करा

मान्सूनपूर्व पावसादरम्यान पिवळ्या बेडूकांचा पाऊस पडल्याची अफवा पसरली आणि मग काय आधीच कोरोनाने धास्तावलेले नागरिक आणखीनच घाबरून गेले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथे हा प्रकार घडला आहे . परिसरातील तलाव आणि पाणवठ्यांवर गडद पिवळ्या रंगाचे बेडूक अचानक आढळून येत आले आणि नागरिक घाबरून गेले. yellow frog in buldhana khamgaon

सदर बेडूक विषारी असल्याची अफवा पसरली असून अशा प्रकारचे बेडूक आढळल्यास अपशकून घडत असल्याची अंधश्रध्दा परिसरात पसरत आहे. त्यामुळे या बेडकांबाबत विविध शंका आणि कुशंका व्यक्त होत आहेत. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत आणि पावसातून बेडूक पडत नाहीत, अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली तसेच केवळ अंधश्रद्धेपोटी त्यांचा जीव घेऊ नये, असेही आवाहन केलं आहे .

तलाव आणि पाणवठ्यांवर आढळून येणारे बेडूक मान्सूनपूर्व पावसातून पडल्याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात होत आहे. पावसातून मासे पडू शकतात तर बेडूक का नाही ? असा प्रश्न ग्रामीण भागातील काही जुन्या जाणत्या नागरिकांनी उपस्थित केला त्यामुळे खामगाव आणि परिसरात भीतीचे सावट पसरले आहे त्यामुळे काही व्यक्तींनी घाबरून त्यांच्यापासून लांब राहणे पसंत केले आहे तर काही जण त्यांना मारण्याचा देखील पर्याय सुचवत आहेत मात्र ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ यांनी म्हटलेले आहे .

पर्यावरणतज्ज्ञ काय म्हणतात ?

खामगाव आणि परिसरात आढळून आलेले बेडून उष्मकालीन समाधीतून बाहेर आलेले नर बेडूक आहेत. मिलनोत्सूक असलेले हे बेडूक मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांचा रंग हा भलताच आकर्षक दिसतो. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत आणि पावसातून बेडूक पडत नाहीत , अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहे तसेच त्यांना न मारण्याचे आवाहन देखील केले आहे .


शेअर करा