हत्याकांडाने जिल्हा हादरला मात्र तपासात ‘ वेगळीच ‘ माहिती आली समोर..

शेअर करा

देशात रोज नवीन नवीन गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात .अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. तासगाव येथील जेसीबी मालक हरी पाटील यांचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. या रहस्यमय खुनाचा अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उलगडा केला असून एका जेसीबीवरील ऑपरेटर आणि त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

भिलवडी ते तासगाव रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीत 10 जून रोजी एक मृतदेह आढळला होता. विहीरीत मतदेह हा काळ्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला होता. पोलिसांनी मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढलं तेव्हा त्या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यासह एलसीबीच्या पथकास सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने वेगवेगळी पथके तयार करून संशयितांचा शोध सुरु केला.

उपलब्ध असलेल्या तांत्रिक माहितीच्या अधारे तासगाव नगरपालिकेच्या ठिकाणी जेसीबीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता मृतक हा मंगसुळी (कर्नाटक) येथील रहिवासी असल्याचे समोर आले. मंगसुळी येथे पथकाने चौकशी केली असता जेसीबी मालकाचे नाव हरी पाटील असल्याची ओळख पटली. तो गायब असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

पोलिसांना जेसीबीवरील ऑपरेटर सुनील राठोड हाही पसार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेवून ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. मृत हरी पाटील हा राठोड याच्या पत्नीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याने केला. यातूनच दोघांमध्ये वाद झाला, अशी देखील माहिती त्याने पोलिसांना दिली.

पाटील याच्यासोबत वाद झाल्यावर सुनील याने जेसीबीवरील काम सोडले. त्यानंतर 8 जून रोजी मृतक हरी हा सुनील याला बोलविण्यासाठी गेला. त्यानंतर राठोड पती-पत्नी यांनी मिळून हरी पाटील याच्या डोक्यात खोरे घालून त्याचा खून केला. त्यानंतर संशयित दोघांनी त्याचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. त्यानंतर भिलवडी ते तासगाव रस्त्यावरील एका विहिरीत तो मृतदेह टाकून दिला. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी काळ्या प्लॉस्टिकच्या कागदात मृतदेह गुंडाळला. त्यानंतर गोनपाटाच्या किलतानास दोरी बांधून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.


शेअर करा