‘ हनी ट्रॅप ‘मध्ये अडकलेल्या व्यावसायिकाची आत्महत्या

शेअर करा

गेल्या काही महिन्यापासून ‘हनी ट्रॅप’ची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत . असेच एक प्रकरण फरीदाबाद इथे उघडकीस आले आहे . व्यावसायिकाच्या आत्महत्येनंतर ‘हनी ट्रॅप’चा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे . व्यावसायिकाचं नाव शंकर नरुला असं असून बुधवारी त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.

पीडित कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, शंकर नरुला यांनी इन्स्टाग्रामवरून एका व्यक्तीची मदत केली होती. या व्यक्तीला मदत म्हणून ५० हजार रुपये नरुला यांनी ट्रान्सफर केल्याचं पोलिसांच्या समोर आलं. हे अकाऊंट अरबाज रिझवी याच्या नावानं होतं. मदतीसाठी आभार मानण्याच्या निमित्तानं अरबाज रिझवी यानं व्यावसायिक शंकर नरुला यांना दिल्लीला बोलावलं. दिल्लीत नरुला यांना नाजिया नावाची एक मुलगी भेटली. या भेटीदरम्यान अमली पदार्थ देऊन शंकर नरुला यांना बेशुद्ध करण्यात आलं तसंच त्यांचे काही अश्लील फोटोही काढण्यात आले.

शंकर नरुला यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १,२०,००० रुपये बळकावण्यात आलं. तसंच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी पीडिताकडे आणखीन ४ लाख रुपयांची मागणी केली. आरोपींकडून केल्या जाणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून नरुला यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं, असा आरोप पीडित कुटुंबानं केलाय.

पोलिसांनी मृत शंकर नरुला यांचा मुलगा अनुराग नरुला याच्या तक्रारीनंतर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी आरोपींवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना दिल्लीतून अटक केली. ‘हनी ट्रॅप’साठी ईशा, जीनत, आशिया, जुही आणि अरबाज रिझवी अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय.


शेअर करा