मास्टरमाईंडच ..अटक केलेल्या ‘ ह्या ‘ तरुणाचा कारनामा वाचाल तर थक्क व्हाल

शेअर करा

सोशल मीडियावरील प्रलोभनांना अनेक जण बळी पडतात. असाच प्रकार सांगलीत घडला आहे. जर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील एका वकील महिलेची थोडी थिडकी नव्हे तर तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विटा येथील लेंगरे गावातील एका तरुणाने हा प्रताप केला आहे. त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सांगलीच्या विटा जवळील लेंगरे येथे वैभव शिंदे हा राहतो. त्याने कोरोनाचा प्रादुर्भावमध्ये महाराष्ट्र आणि शहरे लॉकडाऊन झाली. लॉकडाऊन काळात वैभवला देखील त्या मोबाईलचाच आधार होता. त्यामुळे त्या काळात वैभवने फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर शक्कल लढवत भरत जाधव या नावाने खोटे अकाउंट काढले. परदेशात राहतोय असे भासावे म्हणून त्याने मॉडेल सारखे फोटो काढून त्याने फेसबूक , इंस्टाग्राम वर पोस्ट करण्याचा सपाटा लावला. यानंतर त्यानं वैभव शिंदे यांनं अनेकांना धडाधड फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला सुरुवात केली.यातील एक फ्रेंड रिक्वेस्ट मुंबईतील एका महिला वकीलाला पाठवली आणि तिने त्याची रिक्वेस्ट मान्य केली त्यानंतर खरा खेळ सुरु झाला.

फेसबुक आणि इन्स्टंग्राम या या सोशल मीडियावर वैभव शिंदे याने भरत जाधव या प्रोफाईलमध्ये तो जर्मनी या देशात डॉक्टर व्यवसाय करत असल्याची खोटी माहिती दिली होती.मुंबईतील या वकील महिलेने वैभवने बनवलेल्या अकाउंटवर चॅटिंग सुरू केले. कधी हिंदी, कधी मराठीत चॅटकरून वैभव शिंदे याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वैभवने आपला मोबाईल क्रमांक महिला वकिलाशी चॅटद्वारे शेअर केला. त्यानंतर व्हट्सअपच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले.

व्हॉटसअप द्वारे मेसेजेस, फोन कॉल करुन आणखी विश्वास संपादन केला. मात्र यादरम्यान वेगवेगळी कारणे सांगून या महिला वकिलाकडून वैभव शिंदेने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल 14 लाख 92 हजार रुपये घेतले. ही रक्कम महिला वकिलांकडून घेताना त्याने आपली आई कोरोनाने आजारी आहे. आपले वडील आजारी आहेत. चुलते वारलेत, बहिणीच्या नव-याची प्रकृती गंभीर आहे. मुंबईमध्ये आल्यावर पैसे देतो असे म्हणून पैसे घेतले.

अखेरीस 7 जूनला वैभव शिंदे याने अचानक सोशल मीडियावरची आपली भरत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंटस डीअक्टिव्हेट केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच वकील महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. त्यावरून संबंधित नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तत्काळ या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. शिवाय दोघांमधील संभाषणाचे आणि वैभव शिंदे यांना वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. आणि विटा पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे.


शेअर करा